ETV Bharat / state

विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरी 'लाडकी बहीण योजना' कधीही बंद होणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचे सर्व अडथळे फेटाळत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ठाम ग्वाही दिली आहे.

CM Eknath Shinde in Ahilyanagar
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 25, 2026 at 4:48 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

राहाता (अहिल्यानगर) : विरोधकांनी कितीही आटापिटा केला आणि अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, तरी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' कधीही बंद होणार नाही, अशी ठाम ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राहाता तालुक्यातील धनगरवाडी-दिघी येथे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या सोहळ्यात बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र ही संतांची व वारकऱ्यांची भूमी असल्याचे सांगत, छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांच्या आशीर्वादानं सरकार सत्तेवर आल्याचं स्पष्ट केलं. संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करू शकत नाही, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहिती देताना (ETV Bharat)

''महायुती सरकारनं महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरू केलीय. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक आधार देण्याचा सरकारचा मुख्य प्रयत्न आहे. मात्र, विरोधी पक्षांकडून ही योजना बंद करण्याबाबत सातत्यानं वक्तव्यं केली जात आहेत. विरोधकांनी योजना बंद पाडण्यासाठी कितीही आटापिटा केला किंवा अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, तरी ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही'', असे शिंदे यांनी स्पष्ट केलं.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'शेतकरी सन्मान योजनेच्या' धर्तीवर महायुती सरकारनं 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' सुरू केलीय. सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा असेल, तर तो आपल्या बळीराजाचा आहे. नुकताच लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा पुढील हप्ता जमा करण्यात आला आहे. शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी महायुती सरकार विविध योजना राबवत आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सरकार एक 'टीम' म्हणून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्यानं काम करत राहील.

हेही वाचाः

  1. राम रहीमची 17 व्यांदा तुरुंगातून सुटका; 21 दिवसांच्या पॅरोलदरम्यान सिरसा येथील डेरा सच्चा सौदा आश्रमात राहणार
  2. अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीत तीन बालकांचा मृत्यू, आतापर्यंत कुठे कुठे घडल्या आगीच्या घटना; जाणून घ्या घटनाक्रम