ETV Bharat / state

इराण-इस्रायल संघर्ष : कोल्हापुरातील एमबीबीएसचे 6 विद्यार्थी शारजाहमध्ये अडकले

कोल्हापुरातील एका खाजगी शिक्षण संस्थेद्वारे जॉर्जियाला निघालेले 6 विद्यार्थी शारजाह इथं अडकले आहेत. विद्यार्थ्यांशी संबंधित संस्था आणि पालक संपर्कात आहेत.

Kolhapur mbbs Students Stuck in Sharjah
कोल्हापुरातील एमबीबीएसचे 6 विद्यार्थी शारजाहत अडकले (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 2, 2026 at 11:55 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर : सध्या इस्त्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाच भडका उडाला आहे. आखाती देशाना त्याची झळ पोहोचत आहे. त्यामुळे अनेक जण दुबई, बहरीन, दोहा या ठिकाणी अडकले आहेत. या युद्धामुळे जगभरातील अनेक विमान उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. याचा फटका कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनाही बसला आहे.

कोल्हापुरातील एका खाजगी शिक्षण संस्थेद्वारे जॉर्जियाला निघालेले 6 विद्यार्थी शारजाह इथं अडकले आहेत. विद्यार्थ्यांशी संबंधित संस्था आणि पालक संपर्कात आहेत. सध्या हे विद्यार्थी आणि त्यांचे केअरटेकर सुरक्षित असून परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. संस्था प्रमुख ज्ञानेश्वर भस्मे यांच्या माहितीनुसार, लवकरच ही परिस्थिती सुलभ होईल आणि विद्यार्थी येथून बाहेर पडतील.

कोल्हापुरातील एमबीबीएसचे 6 विद्यार्थी शारजाहत अडकले (Etv Bharat)

कोल्हापूरचे विद्यार्थी शारजाहमध्ये अडकले : सध्या इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका विविध क्षेत्रांवर पडत आहे, विशेषतः परदेशात शिक्षणासाठी गेलेली विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. कोल्हापूरातील एका इन्स्टिट्यूटमार्फत काही विद्यार्थी जॉर्जियाकडे निघालेले असताना दुबईजवळील शारजाह शहरात विमान नसल्यामुळे अडकून पडले आहेत.

कोल्हापूरमधील विश्व एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे प्रमुख ज्ञानेश्वर भस्मे यांच्या माहितीनुसार, 6 विद्यार्थी एमबीबीएस अभ्यासासाठी जॉर्जियाकडे रवाना झाले आहेत. या 6 विद्यार्थ्यांमध्ये तीन मुलं आणि तीन मुली असून, सोबत संस्थेचा केअर टेकरही आहे.

दुबई-शारजाह अंतर 40 किमीचं : मुंबई विमानतळावरून 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता रवाना झाल्यानंतर, तीन तासांच्या प्रवासानंतर ते युएईमधील शारजाह विमानतळावर पोहोचले. पुढील विमानानं जॉर्जियाकडे जाण्याचं त्यांचं नियोजन होतं. पण दरम्यानचं विमान रद्द झाल्याने त्यांना शारजाह इथंच मुक्काम करावा लागला. शारजाह दुबईपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे.

'विद्यार्थ्यांसोबत संपर्कात' : केअर टेकरच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांना विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. पहिल्यांदाच परदेशात निघालेल्या या तरुणांवर युद्धजन्य परिस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे. प्रमुख ज्ञानेश्वर भस्मे यांनी सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचं सांगितलं आणि वेळोवेळी त्यांच्याशी संपर्क साधत असल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा