ETV Bharat / state

व्हीएसआरचे मालक रोहित सिंह यांचा व्हिडीओ शेअर करत जय पवारांनी उपस्थित केले प्रश्न

व्हीएसआरचे मालक रोहित सिंह यांचा व्हिडीओ शेअर करत जय पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत.

Jai Pawar raised questions while sharing Rohit Singh video
रोहित सिंह यांचा व्हिडीओ शेअर करत जय पवाराने उपस्थित केले प्रश्न (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 2, 2026 at 11:56 AM IST

|

Updated : March 2, 2026 at 12:25 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे सातत्याने या प्रकरणी प्रश्न उपस्थित करीत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत डीजीसीएचा प्राथमिक अहवाल आलाय. असं असताना आता अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी व्हीएसआरचे मालक रोहित सिंह यांचा व्हिडीओ शेअर करत प्रश्न उपस्थित केलाय. जय पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, माझ्या वडिलांना आपण गमावले. ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडीओमध्ये व्हीएसआरचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे.

रोहित सिंह यांचा व्हिडीओ शेअर करत जय पवाराने उपस्थित केले प्रश्न (Source- ETV Bharat)

अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी : मी डीजीसीएला ठामपणे मागणी करतो की, या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत व्हीएसआरची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे. माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी हे करणं आवश्यक असल्याचंही यावेळी जय पवार यानं सांगितलंय.

इतर विमानांमध्येही त्रुटी असण्याची शक्यता : जय पवार यानं म्हटलं आहे की, डीजीसीएने ज्या मुद्द्यांवर व्हीएसआरची काही विमाने ग्राउंड केलीत, त्याच मुद्द्यांवर इतर विमानांमध्येही त्रुटी असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. जर सुरक्षेसंदर्भातील नियम आणि प्रक्रियांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असतील, तर केवळ काही विमानांपुरती कारवाई न करता संपूर्ण व्हीएसआर फ्लिटबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक असल्यास व्हीएसआरच्या संपूर्ण विमान ताफ्याचे पूर्णपणे संचालन बंद करण्याचाही डीजीसीएने विचार करावा, असं त्याने म्हटलं आहे.

Last Updated : March 2, 2026 at 12:25 PM IST