ETV Bharat / state

आयटी इंजिनियर मुलीचा चेन्नईमध्ये समुद्रात बुडून मृत्यू; मृतदेह लवकर ताब्यात देण्याची भावाची मागणी

चेन्नईमध्ये गोल्ड बीच येथे भंडारा येथील मयुरी चौधरीचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. यावर तिच्या भावानं प्रतिक्रिया दिली.

IT engineer Mayuri Chaudhary death
मयुरी चौधरीचा मृत्यू (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 22, 2026 at 7:02 PM IST

|

Updated : February 22, 2026 at 8:41 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

भंडारा- माहिती तंत्रज्ञान विषयांमध्ये नुकतीच अभियंता झालेल्या भंडाऱ्याच्या मुलीचा चेन्नई–पुडुचेरी रोडवरील कंथाट्टूर पोलीस स्टेशन हद्दीतील समुद्रकिनारी घडलेल्या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील मयुरी चौधरी असं या अभियंता मुलीचं नाव आहे. 21 फेब्रुवारीच्या सायंकाळी ही घटना घडल्यानंतर त्याची माहिती मिळताच कुटुंब मयुरीचा मृतदेह आणण्यासाठी चेन्नईला गेलेला आहे. मृतदेह आणण्यासाठी राज्य सरकारनं सहकार्य करावं, अशी विनंती कुटुंबातील लोकांनी केलेली आहे.

सुरुवातीपासूनच हुशार असलेली मयुरी हिनं भंडारा जिल्ह्यातीलच वरठी येथील सनफ्लॅग शाळेत तिचं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर श्री. गुरुगोविंद इंजिनिअरिंग कॉलेज नांदेड येथे माहिती व तंत्रज्ञान या विषयात अभियांत्रिक अभ्यास करण्यासाठी गेली होती. नुकताच तिला इंटर्नशिपसाठी चेन्नईस्थित कॉग्निझंट (Cognizant) या आयटी कंपनीत काम करण्याची संधी मिळाली.
महाराष्ट्रातील 15 विद्यार्थी कंपनीत इंटर्नशिपसाठी चेन्नई येथे गेले होते. 21 तारखेला सुट्टी असल्यानं जवळपास 26 जण समुद्रकिनारी फिरण्यासाठी होते. यापैकी काही लोकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे समुद्राच्या थोडे आत गेले. पाणी त्यांच्या कमरेपर्यंत होता. फोटो काढत असताना अचानक समुद्रात 10 ते 15 फूट उंच लाट उसळून तिघांना समुद्रात ओढून नेले. बचाव पथकानं एकाला सुखरूप बाहेर काढले. मात्र, मयुरी आणि जळगाव जिल्ह्यातील एक विद्यार्थी आतमध्ये ओढला गेला. त्यानंतर मयुरीचा मृतदेह काढण्यात यश आलं.

मृत तरुणीच्या भावानं काय सांगितलं? (Source- ETV Bharat Reporter)

शनिवारी सुट्टी असल्यानं ते फिरायला गेले होते. त्यांनी प्लॅन केला होता. तेथे एका मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर समुद्रकिनारी गेले. ते सगळे पाण्यात गेले. त्यांच्या पोटाच्यावर पाणी गेले. तेव्हा वातावरण बरोबर नव्हते. वादळही होते. भरतीच्या लाटा येत होत्या. काही वेळानंतर लाटा सुरू होत्या. लाटामध्ये ते सापडले. घटनेची माहिती तिच्या मैत्रिणीकडून संध्याकाळी सात वाजता कळाली. तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी फोन करून माहिती दिली. बाबा आता रुग्णवाहिकेनं तिकडे गेले. आईला यापासून दूर ठेवलेय. तिला या दु:खदायी घटनेची माहिती दिलेली नाही. शक्य ती सरकारनं मला मदत करावी-शैलेंद्र चौधरी, मृत तरुणीचा भाऊ

IT engineer Mayuri Chaudhary death
मयुरी चौधरीचा मृत्यू (Source- ETV Bharat Reporter)

मृतदेह लवकर ताब्यात देण्याची मागणी- 25 दिवसांपूर्वी इंटर्नशिपसाठी चेन्नईत गेलेल्या मयुरीनं आयटी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. तिचे वडील बँक सेवा केंद्र चालवतात. तर आई गृहिणी आणि अभियंता झालेला एक भाऊ आहे. या घटनेची माहिती कुटुंबाला मिळाल्यानंतर तरुण मुलगी गमावल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. माहिती मिळताच मयुरीचे वडील त्यांच्या काही काही कौटुंबिक मित्रांसह मयुरीचा मृतदेह आणण्यासाठी चेन्नईला गेलेला आहे. सध्या, मयुरीचा मृतदेह चेन्नई येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवला गेला आहे. शवविच्छेदन प्रक्रिया तातडीने पूर्ण करून मृतदेह लवकरात लवकर ताब्यात द्यावं, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

हेही वाचा-

Last Updated : February 22, 2026 at 8:41 PM IST