ETV Bharat / state

‘हिंद दी चादर’; गुरु तेग बहादुरजी यांच्या ३५० व्या हौतात्म्य समागमनिमित्त मुंबईत साडेसहा लाख विद्यार्थ्यांचा समूह गायनाचा विक्रम

गुरु तेग बहादुरजी यांच्या ३५०व्या हौतात्म्य समागमनिमित्त मुंबईतील शाळांनी समूह गायनाचा विक्रम रचलाय. 'बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्' कडून विक्रमाची नोंद झाली आहे.

‘हिंद दी चादर’ गुरु तेग बहादुरजी यांच्या ३५० व्या हौतात्म्य समागमनिमित्त मुंबईत साडेसहा लाख विद्यार्थ्यांनी समूह गायन
‘हिंद दी चादर’ गुरु तेग बहादुरजी यांच्या ३५० व्या हौतात्म्य समागमनिमित्त मुंबईत साडेसहा लाख विद्यार्थ्यांनी समूह गायन (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 23, 2026 at 8:53 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुरजी यांच्या ३५० व्या हौतात्म्य समागमनिमित्त मुंबईतील सुमारे 6 लाख 66 हजार 105 विद्यार्थ्यांनी आज (दिनांक 23 फेब्रुवारी) एकाच वेळी समूह गायन करून विक्रम रचला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व महानगरपालिका प्राथमिक, माध्यमिक, खासगी अनुदानित, विना अनुदानित व अन्य मंडळांच्या मिळून एकूण 2 हजार 234 शाळांमधील विद्यार्थी एकाचवेळी या उपक्रमात विविध ठिकाणांहून सहभागी झाले. तसंच राज्यभरातूनदेखील मोठ्या संख्येनं विद्यार्थी या गीत गायन उपक्रमात सहभागी झाले. या विक्रमाची नोंद 'बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्'द्वारे घेण्यात आली आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांताक्रूझ (पूर्व) परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिका नारियलवाडी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्याक विकास विभाग तसंच राज्यस्तरीय समागम समितीद्वारा ‘हिंद दी चादर’ श्री साहिबजी 350वा हौतात्म्य समागमचे दिनांक 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी नवी मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनप्रवासावर आधारित गीताचे मुंबईतील 6 लाख 66 हजार 105 विद्यार्थ्यांनी समूह गायन केले. आज सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सकाळी 9 वाजता तर दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांनी दुपारी 1 वाजता शाळेच्या परिपाठावेळी या गीताचे गायन केले.

‘हिंद दी चादर’ गुरु तेग बहादुरजी यांच्या ३५० व्या हौतात्म्य समागमनिमित्त मुंबईत साडेसहा लाख विद्यार्थ्यांनी समूह गायन
‘हिंद दी चादर’ गुरु तेग बहादुरजी यांच्या ३५० व्या हौतात्म्य समागमनिमित्त मुंबईत साडेसहा लाख विद्यार्थ्यांनी समूह गायन (ETV Bharat)

या निमित्ताने उपायुक्त (परिमंडळ-6) संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण आणि आरोग्य विभाग यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचन, वक्तृत्व, चित्रकला, निबंध आदी स्पर्धांचे तसेच प्रभात फेरी, आरोग्य शिबीर आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

‘हिंद दी चादर’ गुरु तेग बहादुरजी यांच्या ३५० व्या हौतात्म्य समागमनिमित्त मुंबईत साडेसहा लाख विद्यार्थ्यांनी समूह गायन
‘हिंद दी चादर’ गुरु तेग बहादुरजी यांच्या ३५० व्या हौतात्म्य समागमनिमित्त मुंबईत साडेसहा लाख विद्यार्थ्यांनी समूह गायन (ETV Bharat)

याच अनुषंगाने, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करण्यासाठी ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनप्रवासावर आधारित प्रसिद्ध गायक सरताज सिंग यांनी स्वरबद्ध केलेल्या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे (ETV Bharat)

हेही वाचा...

  1. हिंद दी-चादर : गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची मिळते प्रेरणा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  2. 'गुरु तेग बहादुर साहिबजीं'च्या शहीदी स्मरणार्थ नांदेडमध्ये भक्तिभावाचा महासागर; सोहळ्याला पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी