ETV Bharat / state

मुंब्र्यात गणरायाच्या मूर्तीच्या संरक्षणाकरिता मुस्लीम तरुणांचे परिश्रम; सामाजिक ऐक्याचं दाखवून दिलं उदाहरण

गणेशोत्सवाच्या धामधुमीत गणेश मूर्ती स्थापन करण्यासाठी गणेश मंडळाची लगबग सुरू असताना मुंब्र्यात एक घटना घडली. यावेळी मुस्लीम तरुणांनी सामाजिक ऐक्याचं उदाहरण दाखवून दिलं.

Ganesh Festival
गणेश मूर्ती (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 30, 2026 at 8:00 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे - हिंदू, मुस्लीम अशी संमिश्र वस्ती असलेल्या मुंब्र्यात नेहमीच सामाजिक ऐक्य पाहायला मिळालं आहे. आज पहाटे याच पद्धतीनं सामाजिक सौहार्दाचे दर्शन घडवून मुंब्र्यातील तरूणांनी एक आदर्श निर्माण केला आहे. गणरायाच्या मूर्तीला घेऊन गणेशोत्सव मंडपाच्या दिशेनं निघालेली ट्राॅली तुटल्यानंतर या तरूणांनी क्रेन आणली. त्याचबरोबर गणेशमूर्ती दुसरीकडे स्थानापन्न केलीच. शिवाय, सुमारे चार तास परिश्रम घेऊन नवीन ट्राॅली आल्यानंतर गणरायाला मंडपाच्या दिशेने रवाना केले.

मुंब्र्यातील शंकर नगर परिसरात तयार करण्यात आलेली सुमारे 20 फूट उंचीची मार्कंडेय सेवा संस्थेची गणेश मूर्ती भिवंडीच्या पद्मा नगरच्या दिशेनं निघाली होती. मुंब्रा येथील दाभोळकर नाक्यावर गणेशमूर्ती घेऊन येणारे ट्रॉली रात्री बाराच्या सुमारास आली असता या ट्रॉलीचं चाक तुटलं. त्यामुळे गणेश मूर्तीला हानी पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती.
धर्म वेगळे असले, श्रद्धा वेगवेगळ्या असल्या तरी माणुसकीचा धर्म एकच असतो. मुंब्र्यातील काही मुस्लिम तरुणांनी आपल्या कृतीतून हाच हिंदू-मुस्लीम एकतेचा सुंदर संदेश दिलाय. गणरायाची तब्बल 20 फूट उंच मूर्ती घेऊन जाणारी ट्रॉली अचानक रस्त्यात बंद पडली. चाक तुटल्यानं क्षणात गणेशमूर्तीला इजा पोहोचण्याची भीती निर्माण झाली. मात्र, त्याचवेळी मदतीसाठी मुंब्र्यातील मुस्लिम तरुण धावून आले.

श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संगम- रात्रभर तब्बल चार तास त्यांनी गणरायाच्या मूर्तीला आधार दिला. ट्रॉली कलंडू नये, म्हणून जीवाची पर्वा न करता प्रयत्न केले. क्रेन बोलावून मूर्ती सुरक्षितपणे खाली उतरवली. नवीन ट्रॉली आल्यानंतर पुन्हा गणरायाला त्यावर विराजमान केलं. पहाटे चारच्या सुमारास गणरायाचा प्रवास पुन्हा सुरू झाला. इतकंच नाही, तर गणरायाला निरोप देताना मुस्लिम तरुणांनी श्रीफळ वाढवून श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संगमही घडवून आणला. मुंब्रा येथील आरिफ सय्यद उर्फ पापा, बासीत शेख आणि शाहू यांच्यासह अनेक तरुणांनी दाखवलेली ही संवेदनशीलता आजच्या समाजासाठी एक मोठा संदेश आहे.

सामाजिक ऐक्याचं उदाहरण- संकटात धावून येणारी माणुसकी कोणत्या एका धर्माची नसते. मुंब्र्याच्या या मुस्लिम तरुणांनी गणरायाच्या मूर्तीचं रक्षण करत केवळ एक मूर्ती वाचवली नाही. तर हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा आणि माणुसकीवरचा विश्वास आणखी मजबूत केला आहे. मुंब्रा म्हणजे फक्त संमिश्र वस्ती नाही, तर संकटाच्या वेळी धर्माच्या भिंती ओलांडून एकमेकांसाठी उभं राहणारं सामाजिक ऐक्याचं उदाहरण आहे.



एक तास मूर्ती धरून बसले- एक्सेल तुटल्यामुळे ट्रॉली झुकली. त्यामुळे गणेश मूर्तीही खाली पडणार होती. मात्र, तात्काळ मदतीसाठी धावून आलेले तरुण गणेश मूर्ती धरून बसले. तशाच परिस्थितीमध्ये पुढील उपाययोजना सुरू करण्यात आल्या. जवळपास एक तास गणेश मूर्ती पकडून अनेकजण अपघात ठिकाणी बसून होते. यातून सर्वधर्मभाव आणि मुस्लिम युवकांमध्ये असलेला आदर पाहायला मिळाला.

हेही वाचा-