ETV Bharat / state

अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी : महाविद्यालयीन तरुणीवर नराधमांचा बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ओळखपत्र बनवून देण्याच्या बहाण्यानं नराधमानं तरुणीचे अश्लील फोटो बनवून ब्लॅकमेल केलं. त्यानंतर पीडितेची ओळख आपल्या साथीदारांना करुन देत तिच्यावर चार जणांनी अत्याचार केल्यानं खळबळ उडाली.

RAPING COLLEGE GIRL IN KOLHAPUR
नराधमांना नेताना पोलीस (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 3, 2026 at 4:36 PM IST

|

Updated : June 3, 2026 at 5:42 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर : महाविद्यालयीन ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्यानं 20 वर्षीय तरुणीला अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत चौघांनी लैंगिक अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी राधानगरी तालुक्यातील चौघांना मुरगूड पोलिसांनी अटक केलं असून संशयित आरोपींना न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतचा अधिक तपास मुरगूड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील करत आहेत.

चार नराधमांना ठोकल्या बेड्या : राधानगरी तालुक्यातील आदित्य बाजीराव शेटके (रा. खिंडी व्हरवडे ), रणजित संभाजी मुधोळकर (रा. सोळांकुर), प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर ( वय 24 वर्षे रा. राधानगरी) आणि विक्रम रामचंद्र पाटील ( वय 22 वर्षे रा. बुजवडे ) या चौघांनी संगनमतानं कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या खासगी हॉटेलमध्ये नेऊन पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. याबाबतची वाचता कुठं केल्यास अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी पीडितेला देण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे.

अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी : महाविद्यालयीन तरुणीवर नराधमांचा बलात्कार (ETV Bharat Reporter)

पीडित तरुणी पदवीच्या द्वित्तीय वर्षात : मुरगूड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, "पीडित तरुणी पदवीच्या द्वितीय वर्षात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. सेमिस्टरचे ओळखपत्र तयार करण्यासाठी तिनं आदित्य बाजीराव शेटके (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी) याच्या मोबाईलवर आपला फोटो पाठवला. ओळखपत्र देण्याच्या बहाण्यानं त्यानं तरुणीला मुदाळ तिट्टा इथं बोलावून घेतलं. त्यानंतर मुरगूडमध्ये तलाव परिसरामधील झाडीमध्ये नेलं. तिथं तिचे फोटो काढून ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामीची भीती दाखवत त्यानं गिरगाव ता. करवीर येथील एका लॉजवर नेऊन तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर आरोपी आदित्यनं त्या तरुणीची ओळख रणजित संभाजी मुधोळकर (रा. सोळांकुर, ता. राधानगरी) याच्याशी करून दिली. रणजितनं त्या तरुणीला सीबीएस कोल्हापूर येथील लॉजवर नेऊन जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले. यावेळी तिचे अश्लील फोटो, व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली गेली. त्यानंतर आरोपींनी त्या तरुणीची ओळख प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (रा. राधानगरी) याच्याशी करून दिली. त्यानं तरुणीला स्नॅपचॅटवर बोलण्यास भाग पाडलं, स्वतःच्या कारमधून घेऊन जाऊन कात्यायनी येथील एका लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार केला. तसेच विक्रम रामचंद्र पाटील (रा. बुजवडे, ता. राधानगरी) याच्याशीही स्नॅपचॅटवर बोलण्यास भाग पाडून ओळख वाढवून दिली. त्यानंही पाचगावमधील लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या नराधमांना न्यायालयात हजर केलं असता, त्यांना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

प्रकरण मिटवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप : या प्रकरणातील संशयित आरोपी राजकीय कुटुंबाशी संबंधित आहेत. यामुळे मुरगूड आणि राधानगरी परिसरात या प्रकरणांची जोरात चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक नेत्यांनी मुरगूड पोलिसांवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कोणत्याही प्रभावाला न घाबरता सखोल तपास करण्याची, सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले आहेत. पोलीस अधीक्षकांनी थेट मुरकुट पोलीस ठाण्यात जात या प्रकरणाची अधिक माहिती घेतली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर यातील काही आरोपींनी अशाच प्रकारचे अनेक कारनामे केल्याची आता चर्चा सुरु आहे. यातील पीडित तरुणी तक्रारीसाठी पुढं आल्या तर पोलीस तपासात अनेक प्रकरणं उघड होतील. त्यामुळे पोलीस तपासाकडं सर्वांचं लक्ष लागून आहे.

हेही वाचा :

  1. खासगी क्लासच्या शिक्षिकेनं विद्यार्थिनीला पाठवलं बेडरूममध्ये अन् भाच्यानं केला बलात्कार : नाशिकला पुन्हा हादरा
  2. बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर दोन दिवस क्रूर अत्याचार; प्रकृती बिघडल्यानंतर रेल्वे स्थानकावर सोडून दिले; दोघांना अटक
  3. होम स्टेमध्ये राहणाऱ्या विदेशी तरुणीवर आत्याचार : दोन नराधमांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Last Updated : June 3, 2026 at 5:42 PM IST