ETV Bharat / state

'विकासपुरुष हरपला' : अजितदादांचे निकटवर्तीय माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांचं निधन

परतूर विधानसभा मतदार संघाचे विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं आज सकाळी निधन झालं. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Suresh Kumar Jethalia Passes Away
माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2026 at 6:59 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

जालना : परतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेशकुमार जेथलिया यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जालना जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. सुरेशकुमार जेथलिया हे जालना जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठं व्यक्तिमत्व मानलं जायचे. परतूर, मंठा आणि जालन्यात विकासपुरुष आमदार अशी त्यांची ओळख होती.

Suresh Kumar Jethalia Passes Away
माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया (ETV Bharat Reporter)

शिवसेनेकडून 2004 मध्ये विधानपरिषदेवर : शिवसेनेकडून 2004 मध्ये विधानपरिषदेवर त्यांची निवड करण्यात आली. 2009 ची परतूर विधानसभेची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली. यावेळी त्यांनी बबनराव लोणीकर यांचा पराभव करत अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत परतूर विधानसभेची जागा शिवसेना उबाठा पक्षाला मिळाली, त्यामुळे सुरेश कुमार जेथलिया यांनी पुन्हा एकदा बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला.

काँग्रेस पक्षातून ६ वर्षांसाठी निष्कासित : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी परतूर मतदारसंघातून बंडखोरी केली. त्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी निष्कासित करण्यात आलं. त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत परतुर इथं सुरेश कुमार जेथलिया यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. सुरेशकुमार जेथलिया यांचा परतूर शहरावर मोठा प्रभाव होता. तब्बल २५ वर्ष परतूर नगरपालिका त्यांच्या अधिपत्याखाली होती. परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणूनही त्यांनी प्रतिनिधित्व केलं होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर पक्षानं त्यांच्यावर मोठी जबाबदारीही सोपवली होती. दरम्यान सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जालन्यात मोठा धक्का बसला आहे. आज सकाळी पाच वाजेच्या दरम्यान त्यांना झोपेतच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं दुखःद निधन झालं आहे.

हेही वाचा :

  1. पद्मश्री आचार्य चंदना जी यांना अश्रुपूर्ण निरोप; मावळातील अभय प्रभावना इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
  2. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन भास्कर राव यांचं निधन
  3. आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गजांची हजेरी; तब्बूू, सचिन तेंडुलकर, रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर