'हे दिवस मोगलाईपेक्षा वाईट, सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक'; मनोज जरांगे पाटील यांची सरकारवर टीका
30 जूनपर्यंत कर्जमाफीची घोषणा करणार असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. यावरून विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. आश्वासनावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली.

Published : October 31, 2025 at 2:37 PM IST
|Updated : October 31, 2025 at 3:11 PM IST
पुणे : शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलय. या आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या भेट दिली होती. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना बच्च कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली. "आश्वासनानं काहीच होणार नाही. शेतकऱ्यांची आजची परिस्थिती इतकी भयावह झाली आहे की शेतकरी तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही. सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. फक्त आश्वासन देऊन पोट भरणार नाही, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे," असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली.
...याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील : सरकारनं 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं आश्वासन दिलं आहे. याबाबत मनोज जारांगे पाटील म्हणाले "30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळणार म्हणजे तोपर्यंत शेतकऱ्यांचं मरण आहे. लवकर शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढलं पाहिजे. सरकारकडून शेतकऱ्याला आता मदतीची अपेक्षा आहे. ही सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असून याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. काही शेतकऱ्यांच्या खात्यात 3 ते 4 हजार रुपये आलेत. तर काहींच्या खात्यात काहीच पैसे जमा झालेले नाहीत. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील."
हे दिवस मोगलाईपेक्षा वाईट : बच्चू कडू यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले, "सरकार मोगलाईपेक्षा भयावह वागत आहे. आमच्याबाबत देखील असंच होत आहे. एक दीड महिन्यानंतर आमच्या लोकांना नोटीस येत आहेत. सुरुवातीला विरोधाला विरोध व्हायचा. आता जाणूनबुजून खोटे नाटे गुन्हे दाखल करून पोलीस मागे लावले जात आहेत. ही मोगलाईपेक्षा भयावह परिस्थिती आहे. नागपूरमध्ये बच्चू कडू रस्त्यावरच बसले होते. सरकार जर ऐकत नसेल तर मग रस्त्यावर नाही बसायचं तर मग कुठं बसायचं. आता गोरगरीब शेतकऱ्यांनी आपला लढा लढला पाहिजे. कोणावरही भरोसा ठेवू नये. जसा मराठा समाजानं लढा लढला आणि जिंकला, तसं शेतकऱ्यांनी त्यांचा लढा लढला पाहिजे. तेव्हाच सुखाचे दिवस शेतकऱ्यांना येतील."
हेही वाचा :
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा: म्हणाले '30 जूनच्या आत शेतकऱ्यांना देणार कर्जमाफी'
- "1 नोव्हेंबरच्या मोर्चाला राज ठाकरे लोकलनं येणार, नमो सेंटर उभं केलं की फोडून टाकणार"- राज ठाकरे
- "दिलेला शब्द मी पाळला"; पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द झाल्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया

