ETV Bharat / state

जंगलात नेऊन केली अल्पवयीन प्रेयसीची निर्घृण हत्या, वाचा नेमकं काय कारण...

नाशिकमध्ये जंगलात नेऊन प्रेयसीला पिझ्झा खायला दिला. त्यानंतर नराधम प्रियकरानं प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे.

तरुणीच्या प्रियकराला बेड्या
तरुणीच्या प्रियकराला बेड्या (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 21, 2026 at 7:53 PM IST

|

Updated : February 21, 2026 at 8:11 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक - शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाडीवरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात एका तरुणीचा मृतदेह आढळला. या तरुणीचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीच्या गळ्यात तसाच चाकू अडकला होता. स्थानिक गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी अवघ्या काही तासातच तरुणीच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडीवरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात एका तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला होता. तिच्या गळ्यात चाकू अडकला होता. तसंच एका बाजूला अर्धवट खाल्लेला पिझ्झाही आढळून आला होता. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं तपास चक्र फिरवले. अवघ्या काही तासांत पोलिसांनी हत्येचा छडा लावला आहे. ही हत्या दुसरा तिसरा कुणी नव्हे तर तरुणीच्या माजी प्रियकरानेच केल्याची माहिती आता समोर आली आहे. आपल्या प्रेयसीचं दुसऱ्या मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचं कळल्यावर त्यानं मित्रांच्या मदतीनं प्रेयसीचा काटा काढला, असं पोलीस तपासात समोर आलं आहे.

काही तासातच तरुणीच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या (ETV Bharat)


कोण आहे संशयित खुनी - आरोपी तरुण काही वर्षांपूर्वी नाशिक-त्र्यंबकेश्वर रोड वरील एका नामांकित कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचं शिक्षण घेत होता. याच काळात त्याची पीडितेशी ओळख झाली होती. याच ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते.अलीकडेच काही कारणास्तव दोघांमध्ये अंतर निर्माण झालं होतं. प्रेयसीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याची कुणकुण आरोपीला लागली होती. प्रेयसीचं दुसऱ्या मुलावर प्रेम असल्यानं ती आपली हेटाळणी करते,
याच भावनेतून आरोपी प्रियकराने तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून एक जण फरार झाला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.


असा लागला छडा - मुलीच्या हत्येनंतर आम्ही तपासचक्र फिरवले. यात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे राहणारी आणि अकोले येथील एका महाविद्यालयात अकरावीमध्ये शिक्षण घेणारी एक मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार अकोले पोलीस ठाण्यात दाखल होती. यावरून आम्ही मुलीचा फोटो कुटुंबीयांना दाखवला. तेव्हा त्यांनी आपलीच मुलगी असल्याचं सांगितलं. यानंतर आम्ही तपासादरम्यान तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आधीच्या प्रियकराला ताब्यात घेत चौकशी केली असता त्यानं खून केल्याची कबुली दिली, असं पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा...

  1. लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेलं अन् केला वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेचा खून, नेमकं काय घडलं?
  2. बैतूल हादरलं! 25 वर्षीय युवकानं केला आई-वडील आणि भावाचा खून, घरातील मांजरीलाही सोडलं नाही
  3. पत्नीचा गळा आवळून खून; पोलीस कारवाईच्या भीतीनं फरार असलेल्या पतीला शिताफीनं अटक
Last Updated : February 21, 2026 at 8:11 PM IST