ETV Bharat / state

पुणे रेल्वे स्टेशनवर 3.41 कोटी रुपये किमतीचे ॲम्फेटामाइन, एमडीएमए ड्रग्ज जप्त

दिल्लीवरुन पुणे रेल्वे स्थानकावर आलेल्या महिलेकडून ॲम्फेटामाइन, एमडीएमए ड्रग्ज जप्त करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई डीआरआयच्या पुणे केंद्रानं केली.

DRI SEIZES AMPHETAMINE MDMA
ॲम्फेटामाइन, एमडीएमए ड्रग्ज जप्त (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 26, 2026 at 10:30 AM IST

|

Updated : August 26, 2026 at 12:34 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : एका महिला प्रवाशाकडून ॲम्फेटामाइन, एमडीएमए ड्रग्ज जप्त करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स' (DRI) च्या पुणे प्रादेशिक युनिटकडून पुणे रेल्वे स्थानकावर केली आहे. या महिला प्रवाशाकडून अंदाजे 3.41 कोटी रुपये किमतीचं संशयास्पद ॲम्फेटामाइन, एमडीएमए ड्रग्ज अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती डीआरआयच्या सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. अनेक काळापासून अमली पदार्थांच्या वापरात वाढ होताना पाहायला मिळत आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर ॲम्फेटामाइन, एमडीएमए ड्रग्ज जप्त : या प्रकरणी महिला प्रवाशाला अटक करण्यात आली असून तिच्याकडून 3.41 कोटी रुपये किमतीचं ॲम्फेटामाइन, एमडीएमए जप्त करण्यात आलं आहे. याबाबत खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, 'डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स' च्या पुणे प्रादेशिक युनिटकडून २५ ऑगस्ट रोजी पहाटे पुणे रेल्वे जंक्शनवर एका महिला प्रवाशाला अडवण्यात आलं. या महिलेची तपासणी केली असता अमली पदार्थ आढळून आलं आहे. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून ही महिला प्रवास करत होती. या गाडीतून ही महिला पुण्यातून प्रवास करत होती. या माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पाळत ठेवत तिला पुण्यात ताब्यात घेतलं. तिच्या सामानाची सखोल तपासणी केली असता त्यात २,५३२ ग्रॅम पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा स्फटिकयुक्त पदार्थ (ॲम्फेटामाइन ) आणि ८७८ ग्रॅम विविध रंगांच्या गोळ्या ( एमडीएमए ) आढळून आल्या. या जप्त केलेल्या अमली पदार्थांचं एकूण मूल्य अंदाजे ३.४१ कोटी रुपये इतकं असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती डीआरआयच्या वरिष्ठ अधिकाऱयानं दिली आहे.

Last Updated : August 26, 2026 at 12:34 PM IST