ETV Bharat / state

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विशेष विमानाची व्यवस्था; संध्याकाळी 164 प्रवासी मुंबईत दाखल होणार

महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी वैयक्तिकरीत्या संवाद साधला आणि विशेष विमानांची व्यवस्था केलीय. स्टार एअरची दोन विशेष विमाने आज दुपारी फुजैरा एअरपोर्टवरून उड्डाण घेणार आहेत.

Deputy Chief Minister Eknath Shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विशेष विमानाची व्यवस्था (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 3, 2026 at 12:21 PM IST

|

Updated : March 3, 2026 at 12:39 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात युद्धाचा भडका उडाल्याने त्याचा फटका आखाती देशांनाही बसलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राज्यातील नागरिक हे दुबईत अडकून पडलेत. या नागरिकांना शक्य ती मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेतलाय. इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विमानाची व्यवस्था केलीय. या संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी वैयक्तिकरीत्या संवाद साधला आणि विशेष विमानांची व्यवस्था केलीय. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून स्टार एअरची दोन विशेष विमाने आज दुपारी फुजैरा एअरपोर्ट (Fujairah Airport) वरून उड्डाण घेणार आहेत.

  • VTGSO – संध्याकाळी 3.30 वाजता टेकऑफ
  • VT GSH – संध्याकाळी 4.30 वाजता टेकऑफ

तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न करणार : या दोन्ही विमानांमधून एकूण 164 प्रवासी आज संध्याकाळी 5.30 ते 7.00 या वेळेत मुंबई एअरपोर्टवर दाखल होतील. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडिजचे 84 विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आदी भागांतील इतर नागरिकांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच या मराठी नागरिकांशी संवाद साधला होता. “तुम्ही सर्व सुरक्षित आहात, काळजी करू नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील,” असा शब्द एकनाथ शिंदेंनी दिला होता. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांशी अखंड संपर्क साधून या 164 प्रवाशांना मायदेशी आणण्याचा मार्ग मोकळा झालाय.

तुम्हाला सुखरूपपणे महाराष्ट्रात परत आणणार- एकनाथ शिंदे : या युद्धामुळे ठाणे, मुरबाड, पुणे, अहिल्यानगर अशा विविध भागांतून दुबईला गेलेल्या नागरिकांनी मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केलाय. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडिजच्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या महाविद्यालयाचे 84 विद्यार्थी सध्या दुबईत अडकून पडलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुबईतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे डॉ. संजीव पैठणकर आणि सोमनाथ पाटील यांच्या मदतीने या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी त्यांना धीर दिला. या कठीण परिस्थितीत हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असून, तुम्हाला सुखरूपपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न नक्की केले जातील, असेही शिंदे यांनी सांगितलंय.

शक्य ती सारी मदत करणार- एकनाथ शिंदे : तसेच तिथे अडकलेल्या इतर नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. आपण कोणतीही चिंता करून नका, जिथे आहात तिथे आपल्याला काही कमी पडू नये यासाठी शक्य ती सारी मदत देण्याचे प्रयत्न बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने करण्यात येत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी त्यांना सांगितलंय. तसेच महाराष्ट्र शासन आणि उपमुख्यमंत्री म्हणून हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असून, तुम्हाला सुखरूपपणे मायदेशी परत आणण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न केले जातील, असे सांगून शिंदे यांनी या नागरिकांना आश्वस्त केलंय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितलंय. केंद्र सरकार सुद्धा सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारला करीत आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. तसेच आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना व्हॉट्सॲप क्रमांक : +97150 365 4357 संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आलंय.

हेही वाचाः

स्वतः खंबीर व्हायचं अन् लढायला शिकायचं, 'मंग म्हणाल सांगितलं नाही,' प्रसिद्ध रीलस्टार प्रज्ञा राऊत यांची लाइफस्टोरी

आकाशात दुहेरी थरार! मंगळवारी ग्रहणातच चंद्राचा उदय, मुंबईत 3 मिनिटे, पुण्यात 7 मिनिटे दिसणार !

Last Updated : March 3, 2026 at 12:39 PM IST