ETV Bharat / state

माझं नाव घेतल्याशिवाय यांचा दिवस जात नाही; एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अक्कलकोट दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली

EKNATH SHINDE ON THACKERAY
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : November 23, 2025 at 3:44 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अक्कलकोट दौऱ्यावर होते. अक्कलकोट आणि दुधणी नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. अक्कलकोट आणि दुधणी येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. अक्कलकोट शहरापासून हाकेच्या अंतरावर एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने उतरले होते. त्यावेळी माध्यमांसमोर बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना शाब्दिक टोला लगावला. "माझं नाव घेतल्याशिवाय यांचा दिवस जात नाही. अहंकार हा शब्द मी भाजपासाठी नव्हे, तर उद्धव ठाकरेंसाठी वापरला होता," अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अहंकारामुळं रावणाची लंका दहन झाली : डहाणू इथं कार्यक्रमात भाषण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अतिशय मार्मिक भाषेत उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. "अहंकारामुळं रावणाची लंका दहन झाली," असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधणा. याबाबत एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी बोलताना खुलासा करत सांगितलं की "असं मी भाजपावर टीका करण्यासाठी नाही तर घरात बसून काम करणारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी म्हणालो होतो."

घरात बसून काम करणाऱ्या मंत्र्यांना आणि उबाठाच्या नेत्यांना हजम होत नाही : "घरात बसून काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हटवलं. मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पोटात दुखू लागलं आहे. मुख्यमंत्रिपदानंतर आज मी उपमुख्यमंत्री आहे. पण एक कार्यकर्ता म्हणून मी आजदेखील लोकांमध्ये काम करतो, अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

हेही वाचा :

  1. कोल्हापूरच्या चुटकीवाल्या भोंदूबाबाला ठाण्यात अटक; पोलिसांना देत होता चकवा
  2. मध्य रेल्वेची विशेष तिकीट तपासणी मोहीम, फुकट्या प्रवाशांकडून सात महिन्यांत 40.59 कोटी वसूल
  3. महाराजांचा पुतळा पडल्यानंतर बांधकाम कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणात माजी आमदार वैभव नाईकांसह शिवसैनिक निर्दोष