ETV Bharat / state

बाल दिनाचं अनोखं गिफ्ट : कारागृहाच्या भक्कम भिंतींना फुटला मायेचा 'पाझर'; बंदिवानांची मुला-बाळांसोबत गळाभेट

नागपूर कारागृह प्रशासनानं बाल दिनाचं औचित्य साधून कारागृहातील बदीवानांसाठी गळाभेट हा अनोखा उपक्रम राबवला. यातून बंदीवानांची आपल्या पाल्यांसोबत भेट झाली.

Nagpur Jail Gala Bhet
बंदिवानांची मुला-बाळांसोबत गळा भेट (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : November 14, 2025 at 6:32 PM IST

|

Updated : November 14, 2025 at 7:12 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनानं घेतलेल्या पुढाकारातून शुक्रवारी आई-वडिलांच्या प्रेमापासून वंचित झालेल्या सुमारे तीनशे मुलांची प्रत्यक्षात गळाभेट घडवून आणली. निमित्त होतं ते म्हणजे बाल दिनाचं. बंदिवान आणि त्यांच्या पाल्यांची ही गळाभेट हृदयस्पर्शी ठरली. कळत-नकळत कधी तरी हातून घडलेल्या एका गुन्ह्यांची शिक्षा भोगताना मनात प्रबळ इच्छा असूनदेखील स्वतःच्याच मुला-बाळांना भेटता येत नसल्याची खंत बंदीवानांच्या मनात असायची. मात्र, नागपूर कारागृह प्रशासनच्या पुढाकारानं आज बंदिवान आणि त्यांच्या पाल्यांची गळाभेट झाली.

कारागृहात गळाभेट उपक्रम : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात एकापेक्षा एक भीतीदायक बंदिवान मुक्कामी आहेत. कळत-न कळत हातून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहेत. शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांना त्यांच्या कुटुंबाला भेटण्याची संधी सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यामुळं कारागृह प्रशासनानं या गळाभेट कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या माध्यमातून बंदिवान आणि त्यांच्या मुलांचं नातं आणखी घट्ट होणार असा विश्वास नागपूर कारागृह प्रशासनाला आहे. कार्यक्रमाला राज्य माहिती आयुक्त गजानन निमदेव, कारागृह उपमहानिरीक्षक पूर्व विभाग नागपूर वैभव आगे, कारागृह उपअधीक्षक दीपा आगे उपस्थित होत्या.

कारागृहाच्या भक्कम भिंतींना फुटला मायेचा 'पाझर' (ETV Bharat Reporter)

300 बंदीवनांनी घेतली लेकरांची प्रत्यक्ष भेट : कारागृहातील बंदीवानांना वर्षानुवर्षे प्रत्यक्षात आई-वडील आणि स्वतःच्या मुला-बाळांना भेटता येत नाही. त्यावेळची व्यथा शब्दात सांगणं कठीण असतं. बंदीवानांचं हेच दुःख आणि व्यथा ओळखून शुक्रवारी बाल दिनाचं औचित्य साधून नागपूर कारागृह प्रशासनानं बंदिवान आणि त्यांच्या मुला बाळांची गळाभेट घडवून आणली. सुमारे 300 बंदीवानांनी शुक्रवारी आपल्या लेकरांची भेट घेतली. ज्यावेळी ही हृदयस्पर्शी गळाभेट होत होती. त्यावेळी फक्त बंदिवान किंवा त्यांचे पाल्य नाही तर, त्या ठिकाणी उपस्थित असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले होते. कारागृहाच्या उपअधीक्षक दीपा आगे या तर बंदीवनांच्या लोकरांसोबत खेळण्यात आणि त्यांचा लाड करण्यात रमल्या होत्या.

Nagpur Jail Gala Bhet
नागपूर मध्यवर्ती कारागृह (ETV Bharat Reporter)

लहानग्यांच्या गोंगाटानं भेदली कारागृहाची शांतता : कारागृहाच्या चार भिंतीआड असलेली भयान शांतता लहान मुलांच्या गोंगाटामुळं भेदली गेली. निराश तसंच हताश झालेल्या चेहऱ्यांवर आनंदाचे भाव दिसत होते. हे गुन्हेगारी जग किती वाईट असतं याचीही जाणीव बंदीवानांना झाली असावी. मुलाबाळांना आज भेटल्यानंतर बंदीवानांचे डोळे पाणावले होते.

Nagpur Jail Gala Bhet
नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाचा उपक्रम (ETV Bharat Reporter)

अधिकारी झाले भावनिक : गळाभेट कार्यक्रमाच्या निमित्तानं बंदीवानांच्या कुटुंबीयांना कारागृहाच्या चार भिंतीआड काय परिस्थिती असते, हे प्रत्यक्षात अनुभवायला मिळालं. मुलाबाळांसह कुटुंबीय कारागृहात दाखल झाले. त्यामुळं अनेकांना रडू कोसळलं. तर अनेक महिन्यानंतर बंदिवान पती-पत्नीची भेट झाली. तसंच काहींना, आई-वडिलांना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. ज्यावेळी बंदिवान आणि लहान मुलांची भेट झाली, तेव्हाचं भावनिक दृश्य पाहून कारागृहातील अधिकारी सुद्धा भावनिक झाले होते.

Nagpur Jail Gala Bhet
आपल्या पाल्यांसोबत भेट घेताना बंदिवान (ETV Bharat Reporter)

भावनिक पोकळी दूर करण्याचा प्रयत्न : कारागृह विभागाचा बंदीवानांमध्ये सुधारणा आणि पुनर्वसन हा उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीनं बंदी आणि त्यांच्या 18 वर्षाखालील मुलं-मुली, नात व नातू व भाऊ बहीण यांच्यात भेट घडवून आणली. घरापासून जास्त कालावधीसाठी लांब राहिल्यानं येणारी निराशी कमी होईल. बंदी आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये सुसंवाद घडावा आणि बंदीवान यांच्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कारागृहात विविध उपक्रम राबवण्यात आले. बंदी आपल्या कुटूंबापासून दूर राहत असल्यानं त्यांच्यामध्ये भावनिक पोकळी निर्माण होते. गळाभेट सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात येतो.

हेही वाचा :

  1. 'ऑपरेशन तारा' यशस्वी! १ हजार किमीचे अंतर अन् २७ तासांच्या प्रवासानंतर ताडोबातील 'चंदा' वाघिणीचे सह्याद्रीत स्थानांतरण
  2. पाच वर्षीय रिद्धी तोषनीवालचा अनोखा विक्रम; एका मिनिटात फिरवली 114 हून अधिकवेळा काठी
  3. साईंच्या द्वारकामाईत चमत्कार? दृष्टीहीन मुलाला अचानक दृष्टी प्राप्त, 'अंनिस' मात्र आक्रमक
Last Updated : November 14, 2025 at 7:12 PM IST