चेन्नईमधील गोल्डन बीचमध्ये फिरायला गेलेल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा शोध सुरू
महाराष्ट्रातून तामिळनाडूमध्ये समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या एका विद्यार्थिनीनं जीव गमाविला आहे. तर एक विद्यार्थी बेपत्ता आहे.

Published : February 22, 2026 at 3:32 PM IST
मुंबई- तामिळनाडूमधील 'गोल्डन बीच' येथे फिरायला गेलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी संकटात सापडले आहेत. समुद्रात उतरल्यानंतर एका विद्यार्थिनीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर असून विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. मयुरी चौधरी असे मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. तर जय पाटील असे बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.
समुद्रकिनारी फिरण्याकरिता गेलेल्या विद्यार्थ्यांनी जीवघेणे संकट येईल, याची कल्पना केली नव्हती. मात्र, त्यांच्या सहलीच्या आनंदावर विरजण पडले. तर मयुरी चौधरी या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर जय पाटील हा बेपत्ता झाला.
तीन जण पाण्यात उतरले अन् घात झाला...- महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार चेन्नईतील समुद्रकिनाऱ्यावर समुद्रात उतरल्यानंतर महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी घडली आहे. एक विद्यार्थी समुद्रात बेपत्ता झाल्याचं रविवारी अधिकाऱ्यांनी सांगितलं. चेन्नईत फिरायला गेलेले विद्यार्थी कोणत्या संस्थेचे होते, याची अद्याप माहिती समोर आली नाही. तामिळनाडू अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील बुडालेल्या विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य जलद करण्याचं राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार 26 विद्यार्थ्यांचा एक गट चेन्नईतील 'गोल्डन बीच' येथे फिरायला गेला होता. त्यापैकी तीन जण पाण्यात उतरले. यावेळी भंडारा जिल्ह्यातील मयुरी चौधरी बुडाली. तर जय पाटील हा समुद्रात बेपत्ता झाला. त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. सुदैवानं राज केदारी या विद्यार्थ्याला सुरक्षितपणे वाचवण्यात यश आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे.
चेन्नई (तामिळनाडू) येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत पाण्यात उतरताना दुर्घटना घडली असून या घटनेत महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 22, 2026
विद्यार्थ्यांचे कुटुंब तामिळनाडूला रवाना- मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे मदत आणि बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. मयुरी चौधरींच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं. तामिळनाडू सरकारनं सर्व शक्य ती मदत करावी, अशी मुख्यमंत्र्यांनी तामिळनाडू सरकारनं विनंती केली. जय पाटील यांचे नातेवाईक चेन्नईला पोहोचले आहेत. तर मयुरी चौधरी यांचे कुटुंब नागपूरहून तामिळनाडूला रवाना झाले आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलं. प्रशासन हे पीडित कुटुंबांच्या संपर्कात आहे.
हेही वाचा-

