ETV Bharat / state

पणत्यांचा लखलखाट आणि समूह गायनाने ‘वंदे मातरम्’चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा; तब्बल 500 विद्यार्थ्यांनी केले 'वंदे मातरम्'चे समूहगान

पणत्यांचा लखलखाट आणि समूह गायनाने ‘वंदे मातरम्’ चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला असून, तब्बल 500 विद्यार्थ्यांनी 'वंदे मातरम्'चे समूहगान केले आहे.

Centenary Golden Jubilee of  Vande Mataram celebrated with grandeur and group singing
पणत्यांचा लखलखाट आणि समूहगायनाने ‘वंदे मातरम्’चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : November 7, 2025 at 10:23 AM IST

|

Updated : November 7, 2025 at 11:55 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे: तब्बल दीड हजार पणत्या प्रज्वलित करून साकारलेली अक्षरे अन् पाचशे विद्यार्थ्यांनी खड्या आवाजात केलेले वंदे मातरम् चे समूहगान, अशा देशभक्तीने भारलेल्या वातावरणात वंदे मातरम् या अजरामर गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आलाय. यावेळी वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त विद्यार्थ्यांकडून तब्बल 1500 हजार दीप प्रज्वलित करण्यात आले.

पणत्यांचा लखलखाट आणि समूहगायनाने ‘वंदे मातरम्’चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा (Source- ETV Bharat)

मैदानावर वंदे मातरम् ही अक्षरे रेखाटण्यात आली होती : पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला इतिहासप्रेमी मंडळ आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मैदानावर वंदे मातरम् ही अक्षरे रेखाटण्यात आली होती. कविवर्य ग. दि. माडगूळकर लिखित ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ हे गीत गात विद्यार्थ्यांकडून 1500 पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करत तिरंगा ध्वज फडकाविला. तसेच तब्बल 500 विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् गीताचे समूहगान सादर केले.

Centenary Golden Jubilee of  Vande Mataram celebrated with grandeur and group singing
पणत्यांचा लखलखाट आणि समूहगायनाने ‘वंदे मातरम्’चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा (Source- ETV Bharat)

वंदे मातरम हे गीत नाही तर ऊर्जा : यावेळी ज्येष्ठ लेखक डॉ. न. म. जोशी म्हणाले की, क्रांतीची ज्वाला कधीही विझत नाही. राष्ट्र प्रेमासाठी अर्पण होणारे विद्यार्थी व्हा आणि राष्ट्रप्रेम आणि सदवर्तन ठेवा. वंदे मातरम हे गीत नाही तर ऊर्जा आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Centenary Golden Jubilee of  Vande Mataram celebrated with grandeur and group singing
पणत्यांचा लखलखाट आणि समूहगायनाने ‘वंदे मातरम्’चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा (Source- ETV Bharat)

500 हून अधिक विद्यार्थ्याकडून वंदे मातरम् गीताचे समूहगान : तसेच यावेळी आयोजक मोहन शेटे म्हणाले की, आज जवळपास 500 हून विद्यार्थ्यांनी एकत्र येत विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् गीताचे समूहगान सादर केलं आहे, तर वंदे मातरम्’ हे गीत गात विद्यार्थ्यांकडून 1500 पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या आहेत. आम्ही भारतीय लोक राष्ट्राला केवळ जमीन मानत नाही, तर ‘आई’ म्हणून तिचे पूजन करतो आणि हाच आपला सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. या भावनेचा गौरव करण्यासाठीच हा दीपोत्सव आयोजित करण्यात आल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

हेही वाचाः

आचारसंहितेतून सूट हवी? मग समितीकडे प्रस्ताव पाठवा; निवडणूक आयोग ठेवणार करडी नजर!

पुणे : मुंढव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट, तिघांवर गुन्हा दाखल

Last Updated : November 7, 2025 at 11:55 AM IST