ETV Bharat / state

शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

बुलढाणा-छत्रपती संभाजीनगर (Buldhana Acciden) महामार्गावरील धाड गावाजवळ शिवशाही बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Buldhana Accident News
भीषण अपघातात तीन दुचाकीस्वार जागीच ठार (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 5, 2026 at 8:02 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बुलढाणा : छत्रपती संभाजीनगरहून मलकापूरकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) शिवशाही बसची आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तिघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये ढालसावंगी (ता. बुलढाणा) येथील अंकुश पाडळे (वय,32) रवी चंदनशे (23) आणि कैलास शिंदे (30) यांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला आणि दुचाकी बसच्या खाली अडकली.



अपघातात तिघांचा जागीच मृत्यू : धडकेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले आणि मोठी गर्दी जमली. ही घटना धाड ते करडी मार्गावरील पुलाजवळ सायंकाळी सुमारे 4.50 वाजता घडली. मलकापूर आगाराची बस (क्रमांक MH-06 BW-3638) करडी येथे पुलावर आली असताना, बस आणि दुचाकी क्रमांक (MH 28 BZ 7242) समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.


ढालसावंगी गावावर पसरली शोककळा : अपघाताची माहिती मिळताच धाड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला. बसमधील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्दैवी घटनेनं ढालसावंगी गावावर शोककळा पसरली आहे. मृतांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला असून, गावकरी शोकाकुल आहेत.

वाहतूक नियम पालनावर प्रश्न : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. भरधाव वाहने, रस्त्यांची खराब स्थिती आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन हे अपघातांचं मुख्य कारण मानलं जातं. या अपघातामुळं पुन्हा एकदा रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियम पालनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. धाड पोलीस अधिक तपास करत असून, लवकरच अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होईल.


हेही वाचा -

  1. रील बनवणं जीवावर बेतलं; धावत्या रेल्वेपुढं रील बनवताना रेल्वेची धडक, युवकाचा जागीच मृत्यू
  2. भरधाव कंटेनर ट्रकनं पायी चालणाऱ्या चिरडले; 6 जणांचा मृत्यू
  3. कावड यात्रेत घुसली मोटारसायकल; १ भाविक ठार; ४ जखमी