ETV Bharat / state

राहुल गांधी यांची केवळ काही मिनिटंच न्यायालयात हजेरी, भाजपानं दाखवले काळे झेंडे

न्यायालयात हजर राहण्यासाठी राहुल गांधी मुंबईत आलेत. यावेळी भिवंडीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत आंदोलन केलं.

RAHUL GANDHI BJP PROTEST
राहुल गांधी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 21, 2026 at 10:13 AM IST

|

Updated : February 21, 2026 at 12:06 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे - काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे न्यायालयात हजर राहण्यासाठी भिवंडी येथे आले होते. त्यावेळी त्यांना भाजपा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. भाजपानं राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन केलं. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी - नवी दिल्लीतील एआय समिटीमध्ये शुक्रवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. त्याचा निषेध म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन करत राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत राहुल गांधी यांचा ताफा सुरक्षित पुढे काढला. भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपानं राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे (ETV Bharat Reporter)

काय आहे नेमकं न्यायालयीन प्रकरण? - खासदार राहुल गांधी हे 2014 मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी भिवंडीत आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्याविरोधात संघाचे स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर हे राहुल गांधी यांचे जामीनदार होते. पण चाकूरकर यांच्या निधनामुळं आता नवीन जामीनदार द्यावा लागणार होता. हर्षवर्धन सपकाळ हे आता नवीन जामीनदार असणार आहेत. त्यासाठी राहुल गांधी हे भिवंडी न्यायालयात हजर झाले होते.

राहुल गांधी यांची न्यायालयात हजेरी - राहुल गांधी त्यावेळी नेमकं काय म्हणाले होते? - भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावात एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येसाठी आरएसएस जबाबदार असल्याचं कथितपणे म्हटलं होतं. या विधानानंतर, संघाचे अधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 500 अंतर्गत बदनामी केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. राहुल गांधी मागील चार सुनावणींमध्ये न्यायालयात हजर राहिले नव्हते. मात्र, आता यावेळी त्यांची उपस्थिती आवश्यक मानली जात होती. त्याप्रमाणे राहुल गांधी यांनी न्यायालयात हजेरी लावली.

हेही वाचा -

  1. भारताचे निर्णय ट्रम्प घेणार का? मोदी सरकारनं देश विकला का? लोकसभेत राहुल गांधी यांचा घाणाघात!
  2. राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'माजी लष्करप्रमुख नरवणे खोटं बोलू शकत नाहीत, मला त्यांच्यावर विश्वास'
  3. राहुल गांधींना लोकसभेत बोलू न दिल्याचा निषेध : मुंबईत युवक काँग्रेसचं आंदोलन
Last Updated : February 21, 2026 at 12:06 PM IST