ETV Bharat / state

महापालिका निवडणूक 2026 : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे 4 नगरसेवक बिनविरोध, भाजपानंही उघडलं विजयाचं खातं

कल्याण डोंबिवली आणि भिवंडी महापालिकेत भाजपा आणि शिवसेना उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे चार तर भिवंडीत भाजपाच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे.

Corporation Election 2026
संपादित छायाचित्र (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 1, 2026 at 8:15 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे : प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांचा मुलगा हर्षल राजेश मोरे हाही प्रभाग क्रमाक 28 अ मधून बिनविरोध निवडणून आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. दुसरीकडं भाजपानंही विजयाचं खातं उघडलं आहे. भिवंडीतील प्रभाग समिती क्रमांक 17 ब मधील भाजपा उमेदवार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पुरुषोत्तम पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.

Corporation Election 2026
विजयी उमेदवार (ETV Bharat Reporter)

कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी झाले. त्यानंतर हर्षल मोरे यांच्या समोरील उमेदवारानं माघार घेतल्यानं आता शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवाय यांच्यासमवेत प्रभागात उभे असलेल्या भाजपाच्या ज्योती पाटील या देखील विजयी झाल्या आहेत. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं आपलं खातं उघडलं आहे.

महापालिका निवडणूक 2026 : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे 4 नगरसेवक बिनविरोध, भाजपानंही उघडलं विजयाचं खातं (ETV Bharat Reporter)

शिवसेनेचं स्थान अधिक भक्कम : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 24 मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेचं स्थान अधिक भक्कम केलं आहे. या प्रभागात शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले. भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तिन्ही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यानं शिवसेनेला मिळालेला हा तिहेरी बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिवसेनेवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचं बोललं जात आहे. तर या तिन्ही नगरसेवकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन करण्यात आलं आहे.

महापालिका निवडणूक 2026 : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे 4 नगरसेवक बिनविरोध, भाजपानंही उघडलं विजयाचं खातं (ETV Bharat Reporter)

सुमित पुरुषोत्तम पाटील बिनविरोध : भिवंडी निजामपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपानं विजयाचं खातं उघडलं आहे. प्रभाग समिती क्रमांक 17 ब मधील भाजपा उमेदवार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पुरुषोत्तम पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. मान सरोवर इथल्या निवासस्थानी विजय जल्लोष साजरा करत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून सुमित पाटील आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचं अभिनंदन करत हा विजय भिवंडीतील विजयाची नांदी ठरेल, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

Corporation Election 2026
विजयी उमेदवार (ETV Bharat Reporter)

चार निवडणुकीत कोणीही झाला नाही बिनविरोध विजयी : "विशेष म्हणजे 24 वर्षांच्या दरम्यान झालेल्या चार निवडणुकीत कोणीही बिनविरोध विजयी झाला नव्हता. तो विक्रम भाजपाचे सुमित पाटील यांनी पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत केला आहे. देशाचं नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्र आणि राज्यात सुरू असलेला विकासाचा रथ कोणी रोखू शकत नाही. या विश्वासानं जनता भाजपाकडं बघत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मानगर इथल्या प्रभाग क्रमांक 17 ब मधील प्रतिस्पर्धी उमेदवारांना परिसरासह शहराचा विकास भाजपाच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो, हा विश्वास असल्यानं त्यांनी मोठ्या मनानं उमेदवारी मागे घेत सुमित पाटील यांना नेतृत्व करण्याची संधी दिली आहे," अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.

Corporation Election 2026
विजयी उमेदवार (ETV Bharat Reporter)

हेही वाचा :

  1. 227 जागांसाठी 2 हजार 516 उमेदवारांचे अर्ज! सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्रांच्या छाननीला सुरुवात
  2. विधानसभा अध्यक्षांच्या कुटुंबातील तिघांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी; राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता यांनी काय म्हटलं?
  3. मुंबईत अखेर महायुतीचं ठरलं! भाजपा 137 तर शिवसेना घटकपक्षांसह 90 जागा लढवणार