ETV Bharat / state

नागपूर महानगरपालिकेत भाजपाचा नवा पायंडा : आजपासून महिलाराज, महापौर-उपमहापौरसह सर्व पदांची महिलांकडे जबाबदारी

नागपूर मनपाची आज विशेष सभा कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. यावेळी स्थायी समिती, विषय समिती, झोन सभापतीपदी भाजपाकडून महिला सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिकेत आजपासून महिलाराज
नागपूर महानगरपालिकेत आजपासून महिलाराज (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 24, 2026 at 10:23 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात भारतीय जनता पार्टी पक्षानं नवा किर्तीमान केलाय. नागपूर महानगरपालिकेत आजपासून महापौर, उपमहापौर, स्थायी समितीसह सर्वच पदांवर महिलाराज सुरू झालेलं आहे. नागपूर मनपाची आज विशेष सभा कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. यावेळी स्थायी समिती, विषय समिती, झोन सभापतीपदी भाजपाकडून महिला सदस्यांची निवड करण्यात आली आहे.


प्रशासनात महिलांचं नेतृत्व मजबूत करण्याच्या दृष्टीनं भाजपानं 100 टक्के महिलांना जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्णतः महिलांच्या नेतृत्वात चालणारी नागपूर महानगर पालिका पहिली महानगर पालिका ठरली आहे. नागपूर मनपाच्या आजच्या विशेष सभेत विषय समित्यांचे सभापतीपदही महिला नगरसेवकांना देण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून नागपूर महानगरपालिकेचं संपूर्ण कामकाज हे महिलांच्या हाती सोपविण्यात आलं आहे.

नागपूर महानगरपालिकेत भाजपाचा नवा पायंडा (ETV Bharat)


नागपूर मनपातील महिलाराज - नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी नीता ठाकरे आणि उपमहापौर लीला हात्तीबेड यांची निवड झाल्यानंतर आज स्थायी समिती अध्यक्षपदी शिवानी दाणी, परिवहन समिती सभापतीपदी - मंगला खेकरे, स्थापत्य समिती - अश्विनी जिचकार,अग्निशमन - मायाताई इवनाते, आरोग्य - मनीषा अतकरे, विधी - निधी तेलगोटे, शिक्षण - संतोषदेवी लड्डा, गल्ली वस्ती निर्मूलन - ऋतिका मसराम, क्रीडा - दर्शनी धवड, महिला आणि बालकल्याण - सारिका नांदुरकर, जलप्रदाय - दिव्या धूरडे, आणि कर आकारणी - सरिता कावरे यांची निवड झाली आहे.

भाजपाच्या आवाहनाला काँग्रेसचा नकार - काँग्रेसच्या वाट्याला स्थायी समितीतील 4 जागा आल्या आहेत. त्या जागांवरही महिलांनाच संधी देण्याचं आवाहन भाजपाकडून करण्यात आलं होतं. तसंच मुस्लिम लीग आणि एमआयएमनेही महिलांना संधी देत या ऐतिहासिक निर्णयात सहभागी होण्याचं आवाहन भाजपानं केलं होतं. मात्र नगरसेवकांचं संख्याबळ लक्षात घेता पूर्णपणे महिला नागरसेविकांना संधी देणं शक्य नसल्याचं काँग्रेस गटनेते संजय महाकाळकर यांनी स्पष्ट केलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा - नागपूर मनपा स्थायी समिती सभापतीपदासह विशेष समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोठा निर्णय घेतलेला आहे. महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारातूनच प्रेरणा घेत नागपूर महानगर पालिकेतही महिलांकडे संपूर्ण नेतृत्व देण्याचा विचार पुढे आला. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री बावनकुळे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यावर नागपूर महानगरपालिकेत सर्व विषय समित्यांच्या अध्यक्षपदी महिलांनाच संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हेही वाचा...

  1. नागपूरमध्ये धावणार 50 'पीएम ई-बसेस', उद्या नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण!
  2. नागपूर महापालिकेत ‘स्त्री’शक्तीचा जागर; महापौर, उपमहापौरसह महत्त्वाच्या पदांवर महिलांना संधी