ETV Bharat / state

पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू, 1600 मीटर धावताना भोवळ येऊन कोसळला!

बीड येथून एक गंभीर घटना समोर आली आहे. पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीदरम्यान 1600 मीटर धावताना तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Beed Youth dies during police recruitment
बीड पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 11, 2026 at 3:43 PM IST

|

Updated : February 11, 2026 at 4:29 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बीड : येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. दीपक वाव्हळ असं मृत तरुणाचं नाव असून तो जिल्ह्यातील परळीचा रहिवासी होता. 1600 मीटर धावताना दीपकला भोवळ आली. अशा स्थितीत त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. डिहायड्रेशनमुळे हार्ट अटॅक आला असण्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.

नेमकं काय घडलं? : मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 12.45 वाजता 1600 मीटर धावण्याच्या शर्यतीसाठी दिपव व्हावळ याचा क्रमांक आला, पण धावताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो खाली पडला. त्याला तत्काळ त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोबतच, हळहळ व्यक्त केली जात आहे.

174 रिक्त पदांसाठी आजपासून पोलीस भरती प्रक्रिया : खरं तर, बीड जिल्हा पोलीस दलातील रिक्त 174 पदांसाठी आज (11 फेब्रुवारी) बुधवारपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया 18 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, यासाठी 8 हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

बीड शहरातील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पहाटे 5.30 वाजता भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा पारदर्शक पद्धतीनं पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी प्रयत्नशील आहेत. संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष व्हावी, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. धावण्याच्या चाचणीसाठी जागतिक स्तरावर वापरलं जाणारं 'फोटो फिनिश' तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आलं आहे.

तसेच, परिसरात सीसीटीव्ही आणि व्हिडिओ चित्रीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांनी कोणतं उत्तेजक द्रव्य घेतलं आहे का? याची खातरजमा करण्यासाठी रक्त तपासणीही केली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनित कावत यांनी दिली.

हेही वाचा

Last Updated : February 11, 2026 at 4:29 PM IST