ETV Bharat / state

सैफ अली खानच्या हल्ला प्रकरणातील आरोपीची गुन्हा कबूल करण्याची तयारी, कोर्टानं राज्य सरकारकडून मागितलं उत्तर

अभिनेता सैफ अली खानवर हला करणाऱ्या बांगलादेशी आरोपीनं गुन्हा कबूल करण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 11 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.

Saif Ali Khan attack case
संग्रहित-डावीकडून आरोपी, उजवीकडे सैफ अली खान (ETV Bharat Reporter/ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 28, 2026 at 10:54 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून चाकूनं हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बांगलादेशी आरोपीनं शुक्रवारी कोर्टात अर्ज सादर करत आपला गुन्हा कबूल करण्याची तयारी दर्शवलीय. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामनं आपला गुन्हा कबूल करून न्यायालयाकडून दया दाखविण्याची विनंती या अर्जातून केली आहे.



काय आहे आरोपीचा अर्ज - 19 जानेवारी 2025 रोजी वांद्रे येथील सैफ अली खानच्या निवासस्थानी घरात घुसून त्याच्यावर धारदार चाकूनं हल्ला केल्याच्या आरोपाखाली इस्लाम याला अटक करण्यात आलीय. सध्या तो न्यायालयीन कोठडीत कैद आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई सत्र न्यायालयानं त्याच्यावर आरोपनिश्चितीची प्रक्रिया पूर्ण करत खटला सुरू करण्याचा मार्ग केलाय. प्राणघातक शस्त्राचा वापर करून दरोडा घालणं, गंभीर दुखापत करणं आणि घरात अनधिकृत प्रवेश करणं या आरोपांखाली मोहम्मद इस्लामवर बीएनएस अंतर्गत आरोपनिश्चित करण्यात आलेत. दरम्यान, आरोपीनं आपल्या वकिलामार्फत शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करत आपल्याला गुन्हा कबूल करायचा आहे, अशी विनंती केली. तसेच शिक्षा सुनावताना न्यायालयानं आपल्याबाबत सहानुभूतीचा विचार करावा, अशीदेखील विनंती केलीय. ही विनंती अर्ज आपले वकील विपुल दुशिंग यांच्यामार्फत आरोपीनं कोर्टात दाखल केलाय. न्यायमूर्ती जी.पी. देशमुख यांनी याची दखल घेत सरकारी पक्षाला यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश देत पुढील सुनावणी 11 सप्टेंबरपर्यंत तहकूब केलीय.



कोण आहे आरोपी - 2025 मध्ये अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी आरोपी मोहम्मद शरीफउल इस्लाम शहजाद (वय 30) हा अटकेत आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला दोन दिवसांनंतर ठाण्यातून सापळा रचत फिल्मी स्टाईलमध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. तो पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील रहिवाशी असून बेकायदेशीररित्या तो घुसखोरी करून भारतात आल्याचं समोर आलंय. 16 जानेवारी 2025 रोजी सैफ अली खान यांच्या घरी चोरीच्या उद्देशानं आरोपी गेला होता. हा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचं स्पष्ट होताच पोलिसांनी त्याच्या कलमांत वाढ केली होती. भारतात तो अवैधरित्या राहत असताना त्यानं स्वत:चं मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद हे नाव बदलून विजय दास असं ठेवल्याची माहिती पोलीस तपासांत समोर आली.



काय घडली होती घटना - मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अभिनेता सैफ अली खानच्या घरी घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीनं त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी चोरीच्या उद्देशानं घरात घुसल्याचं समोर आलं होतं. सैफच्या घरातील एका कर्मचाऱ्यानं पोलिसांना सांगितलं की, हल्लेखोरानं मुलांच्या खोलीत घुसून 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. सैफ अली खाननं मोठ्या हिमतीनं त्याला प्रतिकार करताच त्याच्या पाठीवर वार करून हल्लेखोर तिथून पळून गेला होता. घटनेनंतर जखमी अवस्थेत एका ऑटो रिक्षातून सैफला कुटुंबियांनी लिलीवती रुग्णालयात दाखल केलं होतं.