'मी गेल्यावर मला शहरात दफन करा'-एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचं भावनिक आवाहन
एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांनी बुधवारी निवडणूक प्रचारसभेत इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर टीका केली. तसेच उमेदवारांना निवडून आणण्याचं जनतेला आवाहन केलं.

Published : January 8, 2026 at 8:10 AM IST
|Updated : January 8, 2026 at 9:35 AM IST
छत्रपती संभाजीनगर - "हल्ला करणारे अजून लहान आहेत. माझ्यासमोर पावसातील बेडूक आहेत", अशी टीका एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांनी केली. "माझ्या गाडीवर सहा गोळ्या लागल्या. मार खाल्ला, पोलिसांनी जेलमध्ये टाकले. तुम्हाला मारायचे आहे. मात्र, आम्ही मारणार नाही. कारण, आमचा विचार मरणार नाही, अशा भाषेत असुद्दीन ओवैसी यांनी हल्लेखोरांना उत्तर दिले. या शहरानं मला जे प्रेम दिले, त्याबद्दल मी ऋणी राहील. मी गेल्यावर मला याच शहरात कुठेतरी दफन करा, असं त्यांनी आवाहन केलं. विरोधकांना भांडून उत्तर देऊ नका. पतंग चिन्हावर मतदान करून उत्तर द्या", असेदेखील असुद्दीन ओवैसी यांनी जाहीर सभेत आवाहन केलं.
हल्लेखोरांना इशारा- एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर प्रचारफेरीमध्ये हल्ला करण्यात आला. हा हल्ला पक्षानं उमेदवारी नाकारणाऱ्या उमेदवारानं घडवून आणल्याचा संशय आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घडवून आणल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला होता. या हल्लेखोरांना प्रचार सभेत असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले. "तुम्ही काहीही करा. आमचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. निवडणूक लढा. तुम्ही हरणार आणि जमानत जप्त होणार. तुम्हाला असं करायचं असेल तर पोलिसांना सांगतो, कायदा हातात घेणाऱ्यांना दुबईला पाठवा. यांचे अवैध धंदे बंद करा. त्यांना लोक १५ तारखेला उत्तर देतील".
निवडणून आल्यावर कामे करा, माझं लक्ष असेल- पुढे असुद्दीन ओवैसी म्हणाले "४३३० कोटींचे बजेट असणारी महानगरपालिका आहे. त्याचे नियोजन करण्याची गरज आहे. हैदराबादनंतर आमचे लक्ष औरंगाबादकडे आहे. नासेर सिद्दिकी यांच्यासह पक्षासोबत असणाऱ्यांचे आभार मानतो. ४८ उमेदवारांना संधी दिली आहे. तुम्ही आता लोकांचे काम करा. तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्यामुळे पक्षाला फायदा होतो तर असे नाही. तिकीट दिले नाही तर नाराज होतात. मात्र, मी सर्वांना भेटलो. निवडणुकीनंतर मी पुन्हा येणार आहे. कोणाला तिकीट मिळाले नाही तरी आपल्याला पक्षाच्या प्रचार करायचा आहे. मन मोठे करावे लागते, त्यांच्या डोळ्यात पाणी होते. ही समाजासाठी निर्णय घेण्याची आहे. आपण सोबत येऊन काम करू, निवडणूक जिंकणे सोपं आहे. मात्र, नंतर आपलं काम करणं अवघड आहे. आपण आपला स्वभाव कसा ठेवतो, त्याकडे लक्ष द्या. गरजूंना भेटा, त्यांच्या अडचणी सोडवा".
वक्फ बोर्ड बिल आणले- "इम्तियाज जलील यांना लोकसभेत यश मिळविण्यासाठी दूर ठेवले. त्यांना यश मिळाले असते तर मोदी वक्फबाबत कायदा आणू शकले नसते. अशा गोष्टी घडल्या तर मला यांची कमतरता जाणवते. त्यामुळे तुम्हाला आव्हान करतो की आपला आवाज दाबण्याऱ्या लोकांना हरवलं पाहिजे. आता तेच लोक परत समोर आहे. या लोकांचे कारस्थान पूर्ण होऊ देऊ नका. हे चोर आहेत. कोणाशी घेणे-देणे नाही", अशी टीका एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांनी विरोधकांवर टीका केली.
हेही वाचा-

