ETV Bharat / state

सबजेलमधील सीसीटीव्हीची तोडफोड करुन माजवली दहशत; 'खाकी वर्दी'वरही आरोपीनं टाकला हात

सबजेलमधील सीसीटीव्हीची तोडफोड करुन आरोपीनं पोलिसावर हल्ला केला. या प्रकरणी फैय्याज इस्लाम शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accused Break CCTV In Sub Jail
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 5, 2026 at 5:13 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे : एका गुन्ह्यात अटक आरोपीला सबजेलमधील पोलीस कोठडीत ठेवलं असता, त्या आरोपीनं सबजेलमधील सीसीटीव्ही कॉमेऱ्यासह बल्बची तोडफोड केली. त्याला अटकाव करणाऱ्या कर्तव्यावरील पोलीस हवालदाराच्या खाकी वर्दीवरही हात टाकून शिवीगाळ करत दम दिल्यानं खळबळ उडाली. ही घटना भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याच्या लगतच असलेल्या सबजेलमध्ये घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे. फैय्याज इस्लाम शेख (25 रा. मुंब्रा) असं सबजेलमध्ये धिंगाणा घालणाऱ्या आरोपीचं नाव आहे.

सबजेलमधील सीसीटीव्हीची तोडफोड: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फैय्याज याच्या विरोधात कलम 353 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला न्यायालयाच्या आदेशनं भिवंडी तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या सबजेलमधील पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं. त्यातच सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास पोलीस हवालदार सचिन कृष्णा जगताप (49) हे शासकीय कर्तव्य बजावत असताना आरोपी फैय्याज यानं सबजेलमध्ये मोठ मोठ्यानं आरडाओरड करून हवालदार सचिन जगताप यांची कॉलर पकडून त्यांना अश्लील भाष्येत शिवीगाळकेली. यावेळी त्यांनी प्रतिकार करताच त्यानं पोलीस हवालदाराला धमकावलं. तसेच सबजेलमधील तीन सीसीटीव्ही कॅमेरे आणि तीन बल्ब फरशीवर आपटून फोडून नुकसान केलं.

शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : याप्रकरणी हवालदार सचिन देसाई यांच्या तक्रारीवरून आरोपी फैय्याजच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात भान्यासं कलम 132, 352, 351 (2) अन्वये गुन्हा दाखल केला असून त्यास कलम 35 (3) प्रमाणंनोटीस देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन देसाई करत आहेत, अशी माहितीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. मुख्याध्यापकानं विद्यार्थ्याला लगावल्या कानशिलात: पोलिसांनी ठोकल्या बेड्या, न्यायालयानं पाठवलं कारागृहात
  2. आर्थर रोड जेल, बराक नंबर..., मेहुल चोक्सीच्या अचणीत वाढ, बेल्जियमच्या कोर्टाकडून भारतात प्रत्यार्पणास मंजुरी!
  3. सौम्या हत्याकांडातील आरोपीनं मध्यवर्ती कारागृहातून केला पोबारा; प्रशासनाची पाचावर धारण, श्वान पथकानं केली कमाल