ETV Bharat / state

आज ना उद्या कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांना अटक होणार - ॲड. असीम सरोदे

आज ना उद्या कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांना अटक होणार असा अंदाज ॲड. असीम सरोदे यांनी व्यक्त केला आहे. पाहा त्यांची खास मुलाखत..

ॲड. असीम सरोदे, इन्सेटमध्ये अभिजित दिपके
ॲड. असीम सरोदे, इन्सेटमध्ये अभिजित दिपके (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 3, 2026 at 1:39 PM IST

|

Updated : June 3, 2026 at 3:07 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे - कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 6 जून रोजी भारतात परतणार असल्याची घोषणा केली आहे. तसंच या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलन उभारण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यांच्या या आंदोलनात देशभरातून विविध लोक सहभागी होणार आहेत. अभिजित दिपके यांनी याबाबत कायदे अभ्यासक ॲड. असीम सरोदे यांना देखील फोन केला आणि त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. असीम सरोदे यांनी याबाबत बोलताना सांगितलंं की, आज ना उद्या कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांना अटक होणार असून पुढील काळात जी काही कायदेशीर लढाई असणार आहे, ती आम्ही लढणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.


यावेळी असीम सरोदे म्हणाले की काल माझा अभिजित दिपके यांच्याशी फोनवर संवाद झाला असून त्यांच्याशी चर्चा झाली आहे. ते भारतात आत्ता येऊ नये अशी माझी भूमिका आहे आणि मी त्यांना याबाबत देखील सांगितलं. मात्र ते भारतात येण्यासाठी ठाम असून ते लोकशाही मार्गानं नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणार आहेत, असं त्यांनी सांगितल आहे. त्यांच्या या आंदोलनात देशभरातील काही लोक देखील सहभागी होणार आहेत पण त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती पाहता आणि त्यांच्या या लढ्याबाबत ज्या पद्धतीने ट्रोल केलं गेलं ते पाहता आज ना उद्या त्यांना अटक होणार आहे, ते पाहता जी काही कायदेशीर कारवाई आहे ती आम्ही लढणार असल्याचं यावेळी सरोदे यांनी सांगितलं.

ॲड. असीम सरोदे यांची खास मुलाखत (ETV Bharat)

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्याशी झालेली बातचीत आणि त्यांनी सुरू केलेली लढाई तसंच भविष्यातील कायदेशीर लढाई याबाबत आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी ॲड. असीम सरोदे यांच्याशी खास बातचीत केली आहे. पाहुया..

हेही वाचा...

  1. 'कॉकरोच जनता पार्टी : अभिजीत दिपके 'या' दिवशी येणार भारतात; केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत करणार मोठं आंदोलन
  2. 'कॉकरोच जनता पार्टी'ला लगेच दिलासा नाही; केंद्र सरकार आणि 'एक्स'ला पाठवली नोटीस
Last Updated : June 3, 2026 at 3:07 PM IST