ETV Bharat / state

सेरेब्रल पाल्सी रुग्णांसाठी दिलासा देणारा उपक्रम; डॉ. राजुल वासा यांचा मेंदू पुनर्वसन संशोधनासाठी पुढाकार!

राजुल वासा यांनी राजुल वासा फाउंडेशनमार्फत मुंबई, नाशिक आणि फिनलंड इथं रुग्णांना मोफत पुनर्वसन सेवा दिली जाते, अशी माहिती दिली.

A relief initiative for cerebral palsy patients; Dr. Rajul Vasa's initiative for brain rehabilitation research
सेरेब्रल पाल्सी रुग्णांसाठी दिलासा देणारा उपक्रम; डॉ. राजुल वासा यांचा मेंदू पुनर्वसन संशोधनासाठी पुढाकार! (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 3, 2026 at 4:33 PM IST

|

Updated : March 4, 2026 at 1:53 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त बालकांचा प्रवास हा, या आजाराशी झगडल्यामुळं जितका खडतर असतो, तितकाच किंवा त्यापेक्षा जास्त खडतर त्यांच्या पालकांचा प्रवास खडतर ठरतो. कारण आपल्या बाळाला सामान्य हालचाली करण्यासाठी झगडताना पाहूनआई आणि वडिलांना होणाऱ्या वेदना कोणीच अनुभवू शकत नाही. पण, याच वेदना समजून घेऊन ब्रेनस्ट्रोक, सेरेब्रल पाल्सी आणि अपघातात मेंदूला मार लागून जखमी झालेल्या रुग्णांना पुन्हा चालणं, बोलणं आणि स्वावलंबी जीवन जगता यावं, यासाठी डॉ. राजुल वासा यांनी पुढाकार घेतला असून त्या "वासा कॉन्सेप्ट" या उपचार पद्धतीद्वारे शेकडो रुग्णांना दिलासा देण्याचं काम करत आहेत.

A relief initiative for cerebral palsy patients; Dr. Rajul Vasa's initiative for brain rehabilitation research
सेरेब्रल पाल्सी रुग्णांसाठी दिलासा देणारा उपक्रम; डॉ. राजुल वासा यांचा मेंदू पुनर्वसन संशोधनासाठी पुढाकार! (ETV Bharat Reporter)

दिव्यांग प्रेरणा पुरस्काराने सन्मानित : डॉ. राजुल वासा यांनी मुंबईतील जी.एस. मेडिकल कॉलेज व केईएम हॉस्पिटलमधून फिजिओथेरपीचे शिक्षण घेतलं आणि नंतर स्वित्झर्लंडमध्ये न्यूरो-रिहॅबिलिटेशनचे उच्च शिक्षण पूर्ण केलं. सध्या त्या फ्रान्समधील युनिव्हर्सिटी ऑफ लॉरेन (University of Lorraine) इथं संशोधन विभागात असोसिएट मेंबर म्हणून काम करत आहेत. त्यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (Banaras Hindu University) आणि देशातील विविध संस्थांमध्ये व्याख्यानं दिली आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून महाराष्ट्र शासनानं डॉ. राजुल वासा यांना "दिव्यांग प्रेरणा पुरस्कार" दिला आहे. डॉ. राजुल वासा सांगतात की "वासा कॉन्सेप्ट" पद्धतीमुळं मेंदूच्या आजारानंतर देखील रुग्णांची हालचाल आणि शरीराचे नियंत्रण सुधारण्यास मदत होते. या संकल्पनेवर परदेशातील विद्यापीठांमध्ये अभ्यास आणि संशोधनही झालं आहे.

सेरेब्रल पाल्सी रुग्णांसाठी दिलासा देणारा उपक्रम; डॉ. राजुल वासा यांचा मेंदू पुनर्वसन संशोधनासाठी पुढाकार! (ETV Bharat Reporter)

रुग्णांच्या हालचालींमध्ये 50 टक्के अनुकूल फरक : पुढं माहिती देताना डॉ. राजुल वासा यांनी राजुल वासा फाउंडेशनमार्फत मुंबई, नाशिक आणि फिनलंड इथं रुग्णांना मोफत पुनर्वसन सेवा दिली जाते, अशी माहिती दिली. फिनलंडमधील तुर्कू युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस (Turku University of Applied Sciences) येथील विद्यार्थी नाशिकमध्ये येऊन या उपचार पद्धतीचे प्रशिक्षण घेतात, असं त्या अभिमानानं सांगतात. तसंच मेंदूच्या आजारावर जरी ठोस औषध उपलब्ध नसलं तरी "वासा कॉन्सेप्ट" या उपचार पद्धतीमुळं रुग्णांच्या हालचालींमध्ये 50 टक्के अनुकूल फरक जाणवत असल्याचं डॉ. राजुल वासा यांनी म्हटलं आहे.

A relief initiative for cerebral palsy patients; Dr. Rajul Vasa's initiative for brain rehabilitation research
सेरेब्रल पाल्सी रुग्णांसाठी दिलासा देणारा उपक्रम; डॉ. राजुल वासा यांचा मेंदू पुनर्वसन संशोधनासाठी पुढाकार! (ETV Bharat Reporter)

रुग्णांना मोफत उपचार देण्याचा मानस : "आज जगभरातील अनेक डॉक्टरांनी "वासा कॉन्सेप्ट" आपलीशी केली असून त्यासंबंधी प्रशिक्षण घेण्यासाठी ते भारतात येतात. ही एक भारतीय म्हणून माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे," असं डॉ. राजुल वासा सांगतात. याचबरोबर, रस्ते अपघातात किंवा वेगवेगळ्या अपघातामध्ये डोक्याला मार लागल्यानंतर मेंदूचा आजार उद्भवलेल्या रुग्णांसाठी वासा कॉन्सेप्ट अधिक मोठ्या प्रमाणात वापरण्याचा मानस भविष्यात असल्याचं डॉ. राजूल वासा यांनी सांगितलं. तसंच नाशिकमध्ये सध्या "वासा कॉन्सेप्ट" सेंटर कार्यरत असून भारतातील शक्य तितक्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे सेंटर सुरू करून, त्याद्वारे सेलेब्रल पाल्सी रुग्णांना मोफत उपचार देण्याचा मानस असल्याचं आणि हेच भविष्यातील ध्येय असल्याचं डॉ. राजुल वासा यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. दुबईत युद्धाचा भडका; पिंपरी-चिंचवडमधील 40 ज्येष्ठ नागरिक दुबईत अडकले
  2. 'फडणवीस साहेब, मोदीजी, माझा मुलगा कुवैतमध्ये अडकलाय...'; विशाखा सुभेदार यांची भावनिक साद
  3. मुंबईत होळीचा उत्साह शिगेला; सर्वत्र संगीत, मस्ती आणि तगडा पोलीस बंदोबस्त
Last Updated : March 4, 2026 at 1:53 PM IST