ETV Bharat / state

कांदा एक्सप्रेस धावणार सुसाट : 840 ट्रक कांदा लासलगावहुन दिल्लीला होणार रवाना ; शेतकरी आक्रमक

शहरी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं कांद्याच्या बफर स्टॉकमधून 840 टन कांदा दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. लासलगावमधून विशेष कांदा एक्सप्रेस दिल्लीला रवाना होणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 26, 2026 at 1:20 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक : कांद्याच्या दरानं 70 रुपये किलोपर्यंत मजल मारली आहे. यामुळे शहरी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून 840 टन कांदा दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. लासलगाव इथून विशेष कांदा एक्सप्रेस दिल्लीला रवाना होणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाचा शेतकरी संघटनेनं विरोध केला आहे.

Lasalgaon to Delhi Onion Express
कांदा एक्सप्रेस धावणार सुसाट (ETV Bharat)

तांदूळ, साखर पाठोपाठ कांद्याच्या दर वधारला : तांदूळ, साखर पाठोपाठ कांद्याच्या दरानंही साठीचा टप्पा ओलांडला आहे. देशातील अनेक शहरात कांदा सत्तर रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. यामुळे केंद्र सरकारनं किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी केलेला कांदा दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. लासलगाव इथून विशेष 21 बोगींची विशेष कांदा एक्सप्रेस दिल्लीतील आजाद नगर इथं रवाना होणार आहे. 40 किलोच्या गोण्यांमध्ये हा कांदा दिल्लीकडं रवाना होणार आहे.

Lasalgaon to Delhi Onion Express
कांदा एक्सप्रेस धावणार सुसाट (ETV Bharat)

शासनाचा भाव निश्चित नाही : लासलगाव म्हणून रेल्वेनं दिल्लीतील आझाद नगर इथं निघालेला कांदा तिथं पोहोचण्यासाठी सुमारे 48 तासांचा कालावधी लागणार आहे. आझाद नगर दिल्ली इथं पोहोचल्यानंतर शासनाकडून हा कांदा कोणत्या दरानं विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे, हे निश्चित झालं नाही. त्याचा नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितीमधील कांद्याच्या बाजारभावावर नेमका काय परिणाम होतो हे पुढील चार ते पाच दिवसात स्पष्ट होणार आहे.

Lasalgaon to Delhi Onion Express
कांदा एक्सप्रेस धावणार सुसाट (ETV Bharat)

दोन महिने भाव राहतील चढे : नाशिक जिल्हा कांदा पुरवठादार म्हणून ओळखला जातो. अशात रबी हंगामात झालेल्या गारपीट तसेच अवकाळी अतिवृष्टीमुळे रबी कांद्याचं उत्पादन कमी झालं. अशात कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. कारण बाजारात मुबलक कांदा उपलब्ध नाही. देशात पाऊस उशिरानं दाखल झाला. त्यामुळे खरीप कांद्याच्या पेरणीत उशीर झाला. या दोन कारणांमुळे कांदा पुरवठ्याचं संपूर्ण गणित कोलमडलं आहे. पुढील दोन महिने ग्राहकांना 60 ते 70 रुपये किलो प्रमाणं कांदा खरेदी करावा लागेल, अशी परिस्थिती आहे. ऑक्टोबरपर्यंत नवीन कांदा बाजारात दाखल झाल्यानंतर कांद्याचे भाव स्थिर होतील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

तर शेतकरी रेल्वे रोको आंदोलन करेल : अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. गेल्या काही दिवसापासून कांद्याला चांगले भाव मिळत असल्यानं शेतकरी कुठंतरी सावरत आहे. अशात केंद्र सरकार एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत खरेदी केलेला कांदा बाजारात आणून कांद्याचे भाव पाडण्याचं काम करत आहे. सरकारनं अशा प्रकारचं धोरण राबवलं तर आम्ही मोठं आंदोलन उभं करू आणि रेल्वे रोको करून सरकारच्या निर्णयाचा निषेध करू, असा इशारा शेतकरी प्रतिनिधी शिवा सुरासे यांनी दिला आहे.

हेही वाचा :

  1. पाशा पटेल यांचे निरीक्षण चुकीचं; सरकारने कांद्याचे दर पाडले तर राज्यभर आंदोलन करू; शेतकरी संघटना आक्रमक
  2. 'कांदा उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल'-मुख्यमंत्री
  3. अवकाळी पाऊसासह गारपिटीनं कांद्याचं मोठं नुकसान; 1500 रुपये क्विंटल अनुदान जाहीर करण्याची शेतकरी संघटनेची मागणी