ETV Bharat / state

227 जागांसाठी 2 हजार 516 उमेदवारांचे अर्ज! सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्रांच्या छाननीला सुरुवात

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या 227 जागांसाठी 2 हजार 516 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

Mumbai Municipal Corporation
मुंबई महानगरपालिका (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 31, 2025 at 5:18 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 - 26 च्या अनुषंगाने नामनिर्देशनपत्र स्‍वीकारण्‍याच्‍या अखेरच्‍या दिवशी म्‍हणजेच 30 डिसेंबर रोजी 23 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून मिळून एकूण 2 हजार 122 नामनिर्देशन अर्ज दाखल दाखल झाले आहेत. तर, 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून नामनिर्देशपपत्र सादर करण्‍याच्‍या अखेरच्‍या दिवसापर्यंत एकूण मिळून 2 हजार 516 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.


किती नामनिर्देशन अर्ज दाखल? : याबाबत पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व प्राप्त 2 हजार 516 उमेदवारी अर्जांची छाननी आज सकाळी 11 वाजेपासून सुरू करण्यात आली आहे. छाननी प्रक्रिया पूर्ण केल्‍यानंतर वैधरित्‍या नामनिर्देशित झालेल्‍या उमेदवारांची यादी लगेच प्रसिद्ध करण्‍यात येणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय. नामनिर्देशनपत्र स्‍वीकारण्‍याच्‍या अखेरच्‍या दिवशी म्‍हणजेच मंगळवारी 30 डिसेंबर रोजी 23 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून मिळून एकूण 2 हजार 122 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. तर, सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 594 नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्‍यात आले आहे.


2 हजार 516 उमेदवारी अर्ज दाखल : त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 23 डिसेंबर पासून ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 30 डिसेंबर पर्यंत एकूण 11 हजार 391 उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले. त्यापैकी केवळ 2 हजार 516 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.



प्रशासकीय विभाग / मंगळवारी वितरण केलेले नामनिर्देशन पत्र संख्‍या/ आज अखेर एकूण प्राप्‍त नामनिर्देशन पत्रे याची माहिती पुढीलप्रमाणे -

1) ए + बी + ई विभाग (RO 23) - 45 / 150 प्राप्‍त

2) सी + डी विभाग (RO 22) - 20 / 58 प्राप्‍त

3) एफ दक्षिण विभाग (RO 21 ) - 08 / 75 प्राप्‍त

4) जी दक्षिण विभाग (RO 20) - 35 / 86 प्राप्‍त

5) जी उत्‍तर विभाग (RO 19) - 33 / 137 प्राप्‍त

6) एफ उत्‍तर विभाग (RO 18) - 40 / 118 प्राप्‍त

7) एल विभाग (RO 17) - 21 / 116 प्राप्‍त

8) एल विभाग (RO 16) - 34 / 111 प्राप्‍त

9) एम पूर्व विभाग (RO 15) - 37 / 182 प्राप्‍त

10) एम पूर्व + एम पश्चिम (RO 14) - 61 / 164 प्राप्‍त

11) एन विभाग (RO 13) - 20 / 123 प्राप्‍त

12) एस विभाग (RO 12) - 39 / 125 प्राप्‍त

13) टी विभाग (RO 11) - 30 / 109 प्राप्‍त

14) एच पूर्व विभाग (RO 10) - 26 / 125 प्राप्‍त

15) के पूर्व + एच पश्चिम विभाग (RO 9) - 16 / 93 प्राप्‍त

16) के पश्चिम विभाग + के पूर्व (RO 8) - 0 / 104 प्राप्‍त

17) के पश्चिम विभाग (RO 7) - 27 / 133 प्राप्‍त

18) पी दक्षिण विभाग (RO 6) - 16 / 81 प्राप्‍त

19) पी पूर्व विभाग (RO 5) - 28 / 117 प्राप्‍त

20) पी उत्‍तर विभाग (RO 4) - 07 / 89 प्राप्‍त

21) आर दक्षिण विभाग (RO 3) - 18 / 109 प्राप्‍त

22) आर मध्‍य विभाग (RO 2) - 11 / 51 प्राप्‍त

23) आर उत्‍तर विभाग (RO 1) - 22 / 60 प्राप्‍त

एकूण – वितरित (मंगळवार) 594 / 2016 प्राप्‍त (23 ते 30 डिसेंबर)

हेही वाचा -

  1. 'शिवसेना (उबाठा)-मनसे मुंबई महापालिकेत 100 हून अधिक जागांवर विजय मिळवणार'- संजय राऊत
  2. अहिल्यानगर महापालिका निवडणूक रणसंग्राम; 68 जागांसाठी 300 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार रिंगणात!
  3. महापालिका निवडणूक रणधुमाळी: भाजपा कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; महिलांनी सुरू केलं उपोषण