ETV Bharat / state

ताम्हिणी घाटात भीषण अपघात : खासगी बस डोंगराला धडकून 20 प्रवासी जखमी, 6 प्रवाशांची प्रकृती गंभीर

ताम्हिणी घाटात खासगी बसचा भीषण अपघात होऊन तब्बल 20 प्रवासी गंभीर झाले आहेत. यातील पाच ते सहा प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Private Bus Accident At Tamhini Ghat
अपघातग्रस्त गाडी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 2, 2026 at 3:35 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

रायगड : खासगी प्रवासी बस ताम्हिणी घाटात डोंगराला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 20 प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांमधील 5 ते 6 सहा प्रवासी गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही घटना माणगाव तालुक्यातील ताम्हिणी घाट परिसरात आज सकाळच्या सुमारास घडली. पुण्याहून माणगावच्या दिशेनं येणारी खासगी प्रवासी बस ताम्हिणी घाटातील गारवा हॉटेल परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराला जोरात धडकली. कारला वाचवण्याच्या नादात ही भरधाव बस डोंगराला धडकल्याची माहिती यावेळी स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

Private Bus Accident At Tamhini Ghat
अपघातग्रस्त कार (ETV Bharat Reporter)

बसचा पुढील भाग चक्काचूर : अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून अनेक प्रवासी सीटमध्ये अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस, स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन बचाव पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. जखमींना बाहेर काढून तत्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या जखमी प्रवाशांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

Private Bus Accident At Tamhini Ghat
अपघातग्रस्त गाडी (ETV Bharat Reporter)

घाटात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं घडला अपघात : प्राथमिक माहितीनुसार, घाटातील वळणावर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेनंतर काही काळ ताम्हिणी घाट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, जखमींच्या प्रकृतीकडं प्रशासनाचं लक्ष असून आवश्यक ती वैद्यकीय मदत दिली जात असल्याची माहिती माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी दिली आहे.

Private Bus Accident At Tamhini Ghat
अपघातग्रस्त गाडी (ETV Bharat Reporter)

हेही वाचा :

  1. भांडूप बस अपघातात चार कुटुंब उद्धवस्त, बहिणीच्या लग्नावरुन येताना तरुणीचा गेला जीव, तर एका आईलाही हिरावलं
  2. उत्तराखंडमध्ये मोठा अपघात: अल्मोडामध्ये बस दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी
  3. साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात भीषण अपघात, ट्रॅक्टर ट्रॉलीखाली चिरडून विवाहिता जागीच ठार