नागपुरातील एसीबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात 17 कामगार ठार
मृतकांमध्ये बहुतांश महिलांचाच समावेश आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीसुद्धा प्रशासनाकडून स्फोटाची माहिती जाणून घेतल्यानंतर तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिलेत.

Published : March 1, 2026 at 10:23 AM IST
|Updated : March 1, 2026 at 5:12 PM IST
नागपूर- आज सकाळी नागपूर जिल्हा स्फोटाने हादरलाय. काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील बारूद कंपनीत आज पहाटेच्या सुमारास मोठा स्फोट झालाय. ज्यामध्ये 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 18 कामगार जखमी आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, ज्या ठिकाणी हा ब्लास्ट झालाय तेथील सर्व वस्तू आणि इमारतीचा मलबा पाचशे ते सातशे मीटर दूरपर्यंत फेकला गेलाय. मृतकांमध्ये बहुतांश महिलांचाच समावेश आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीसुद्धा प्रशासनाकडून स्फोटाची माहिती जाणून घेतल्यानंतर तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिलेत. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट दिली असून, परिस्थितीचा आढावा घेतला आहे. स्फोटाच्यानंतर त्या ठिकाणी भीषण आग लागली, सुमारे चार ते पाच तासच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आलेली आहे आणि त्यामुळे बचाव कार्यालाही वेग आलेला होता.
औद्योगिक स्फोटके बनवणारी कंपनीत स्फोट : कळमेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत राहुळगाव या ठिकाणी 'एसबीएल एनर्जी लिमिटेड' ही बारूद कंपनी आहे. ही औद्योगिक स्फोटके बनवणारी कंपनी आहे. खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी स्फोटके, डिटोनेटर्स आणि संबंधित उत्पादने तयार करते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काटोल तालुक्यातील राऊळगाव च्या एसबीएल एनर्जी लिमिटेडच्या कारखान्यात हा स्फोट झाला. ही घटना रविवारी सकाळी 7 ते 7.30च्या दरम्यान कंपनीच्या डेटोनेटर पॅकिंग युनिटमध्ये घडलेली आहे. अर्धा तास आधी शिफ्ट सुरू झाली होती. स्फोटकांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या नॉन अॅलॉय क्रिमिंग प्लांटमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय.
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 1, 2026
मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि…
सर्व कामगार सकाळी 6 वाजता कारखान्यात पोहोचले : कारखान्याची सकाळची शिफ्ट सकाळी 6 वाजता सुरू होते. सर्व कामगार सकाळी 6 वाजता कारखान्यात पोहोचले. घटनेच्या वेळी दोन पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली अंदाजे 35 कर्मचारी उपस्थित होते. सध्या बचावकार्य सुरू आहे आणि तज्ज्ञ घटनास्थळी उपस्थित आहेत. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.
नागपूर जिल्ह्यातील काटोल मधील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी या दारुगोळा निर्मिती कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. मृत कामगारांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींना…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 1, 2026
चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात : सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून हा परिसर सील करण्यात आला आहे. कुणालाही तिथे जाण्याची परवानगी नाही. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्फोटानंतर त्या ठिकाणी भीषण आग लागली होती, सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग सुद्धा आटोक्यात आली आहे आणि, त्यामुळे बचाव कार्यालाही वेग आलेला आहे. कळमेश्वर पोलिसांच्या ठाण्याअंतर्गत राहुळगाव या ठिकाणी 'एसबीएल एनर्जी लिमिटेड' ही बारूद कंपनी आहे. ही औद्योगिक स्फोटके बनवणारी कंपनी आहे. खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी स्फोटके, डिटोनेटर्स आणि संबंधित उत्पादने तयार करते.

‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके पोहोचली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात चिंता व्यक्त केलीय. नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचलेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथकसुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून, आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

मृतकांच्या वारसांना आर्थिक मदत : राऊळगाव येथे स्फोटकांच्या फॅक्टरीत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. याशिवाय संबंधित कंपनी सुद्धा आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबीयांना देणार असल्याच ते म्हणाले आहेत.

कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही यासंदर्भात दुःख व्यक्त केलंय. नागपूर जिल्ह्यातील काटोलमधील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी या दारूगोळा निर्मिती कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 17 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. मृत कामगारांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असंही गडकरी म्हणालेत.

कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट झाले की नाही कोण तपासणार- अनिल देशमुख : नागपूरच्या कोंढाळी परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटक तयार कंपन्या आहे. परिसरात वारंवार अशा घटना घडत असतात. वर्षभरापूर्वी अशा घटनेत कामगाराचा मृत्यू झालेला होता आणि आज एसबीएल या कंपनीत मोठी घटना घडली, ज्यात 17 जणांचा मृत्यू झालाय. चीफ कंट्रोलर ऑफ पेट्रोलियम अँड एक्स्प्पोसिव्ह सेफ्टी अशी संस्था नागपुरात आहे. सर्व प्रमुख अधिकारी नागपुरात असतात. असे असताना कामगाराच्या सुरक्षेसाठी प्रत्येक कारखान्याचा सेफ्टी ऑडिट झालं की नाही हे तपासणे गरजेचे वाटत नाही का असा प्रश्न अनिल देशमुख यांनी विचारलाय. कामगारांसाठी सुरक्षेसाठी सर्व नियमांचे पालन होत आहे का..? होत नसलेल्या सर्व कारखान्याचे लायसन्स रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्य सरकारने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. किमान 50 लाख रुपये मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात यावे, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केलीय.
हेही वाचाः
झोपडपट्ट्यांत शिक्षणाची नवी वाट; 'ग्लोबल टीचर' विजेत्या रूबल नागी काय काम करतात?

