ETV Bharat / state

अखेर ठरलं : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत 1165 उमेदवार रिंगणात, 969 उमेदवारांनी घेतली माघार

पुणे महापालिका निवडणूक 2026 मध्ये आज अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती. तब्बल 969 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून 1165 उमेदवार रिंगणात आहेत.

PUNE MUNICIPAL CORPORATION ELECTION
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 2, 2026 at 11:01 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या प्रक्रियेनंतर महापालिकेच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. 969 उमेदवारांनी माघार घेतली असून पुण्यात असलेल्या एकूण 41 प्रभागासाठी आता 1214 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले आहेत. आज उमेदवारी अर्ज माघारीनंतर काही ठिकाणी थेट लढत तर काही ठिकाणी मैत्रपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. प्रभागनिहाय आकडेवारी पाहता, प्रभाग क्रमांक 27 मध्ये एकाही उमेदवारानं माघार न घेतल्यानं सर्वाधिक 66 उमेदवार रिंगणात आहेत. याउलट, प्रभाग क्रमांक 35 मध्ये माघारीनंतर केवळ सात उमेदवार अंतिम राहिल्यानं इथं तुलनेनं कमी स्पर्धा असलेली लढत होणार आहे.

काही प्रभागात आघाडीत मैत्रीपूर्ण : पुणे महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपा आणि शिवसेना महायुती म्हणून लढणार असल्याचं जाहीर केलं. मात्र त्यानंतर दोन्ही पक्षात जागा वाटपाचा तिढा न सुटल्यानं आता दोन्ही पक्ष वेगळे लढणार आहेत. तर दुसरीकडं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस उबाठा पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे तिन्ही पक्ष एकत्र येत निवडणूक लढणार आहेत. काही प्रभागात जागा वाटपाचा तिढा न सुटल्यानं आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं देखील स्पष्ट झालं आहे.

प्रभाग क्रमांक एकमध्ये घेतली 31 उमेदवारांनी माघार : पुण्यातील प्रभाग निहाय माहिती घेतली असता, प्रभाग क्रमांक 1 मध्ये 64 पैकी 31 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे 33 उमेदवार अंतिम लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये 29 उमेदवारांनी माघार घेतल्यानं 41 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये 35 उमेदवारांनी माघार घेतली असून 21 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. 41 प्रभागांमध्ये सर्वच पक्षांनी ऐनवेळी उमेदवारांना एबी फॉर्म दिले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. दोन दिवसाच्या या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षांना उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी कसरत करावी लागली.

हेही वाचा :

  1. 'मी चुकलो, माझ्यावर लागलेला कलंक मिटवण्यासाठी...'; गुंड बापू उर्फ कुमार नायर Exclusive ऑन 'ईटीव्ही भारत'
  2. 'युती, आघाडीशी पुणेकरांना...'; थेट विधान करत आबा बागुल यांनी विजयाचा व्यक्त केला विश्वास
  3. पुण्यातील भाजपा महिला उमेदवार सोशल मीडियाचा ठरली बळी, रडत रडत सांगितला घडलेला प्रकार