ETV Bharat / sports

24 वर्षांत पहिल्यांदाच असं घडणार; IND vs ZIM सामन्यात लिहिला जाणार नवा इतिहास

2026 चा टी-20 विश्वचषक आता रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. दररोज महत्त्वाचे सुपर-8 सामने खेळले जात आहेत.

IND vs ZIM Match
IND vs ZIM सामन्यात लिहिला जाणार नवा इतिहास (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : February 26, 2026 at 3:39 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

चेन्नई IND vs ZIM Match : 2026 चा टी-20 विश्वचषक आता रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. दररोज महत्त्वाचे सुपर-8 सामने खेळले जात आहेत. टीम इंडियाला त्यांच्या पहिल्याच सुपर-8 सामन्यात पराभव पत्करावा लागला, त्यामुळं आता सर्वांचं आज 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत-झिम्बाब्वे सामन्यावर असेल. जर टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील, तर त्यांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. हा सामना अनेक प्रकारे खास असेल. जेव्हा दोन्ही संघ मैदानात उतरतील तेव्हा नवा इतिहास लिहिला जाईल.

24 वर्षांत हे पहिल्यांदाच घडेल : जेव्हा झिम्बाब्वे या सामन्यात मैदानात उतरेल तेव्हा 24 वर्षांत ते पहिल्यांदाच भारतात भारताविरुद्ध खेळतील. भारतात हे दोन्ही संघ शेवटच्या वेळी 2002 मध्ये एकमेकांसमोर आले होते. तेव्हा दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना दिल्लीच्या मैदानावर खेळला गेला होता आणि त्यावेळी टीम इंडियाचे नेतृत्व सौरव गांगुलीनं केलं होतं. तेव्हापासून, भारतीय आणि झिम्बाब्वे संघ भारतीय भूमीवर कधीही भिडलेले नाहीत. गांगुलीनं त्या सामन्यात शतकही ठोकलं होतं.

दोन्ही संघांना विजय आवश्यक : सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करायचं असेल तर टीम इंडियाला हा सामना मोठ्या फरकानं जिंकावा लागेल. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवामुळं संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. झिम्बाब्वेलाही त्यांच्या पहिल्या सुपर-8 सामन्यात वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला होता, परंतु संघानं स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. सिकंदर रझाच्या नेतृत्वाखाली टीमनं ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका सारख्या संघांना पराभूत केलं.

सामन्यासाठी दोन्ही संघ :

  • भारत : इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, कुलदीप यादव, संजू सॅमसन
  • झिम्बाब्वे : तादिवानाशे मारुमणी (यष्टीरक्षक), ब्रायन बेनेट, डायन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रझा (कर्णधार), टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, ग्रॅमी क्रेमर, ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड नगारावा, बेन करन, क्लाइव मडांडे, टिनोटेंडा मापोसा, वेलिंगटन मसाकाद्जा.

हेही वाचा :

  1. WI vs SA सामन्यावर असेल टीम इंडियाचं लक्ष; सेमीफायनलसाठी समीकरण कसं असेल?
  2. IND vs ZIM सामना पावसामुळं रद्द होणार? चेन्नईमधून आली मोठी अपडेट
  3. रिंकू सिंह झिम्बाब्वेविरुद्ध खेळेल की नाही? प्रशिक्षकांनी थेटच सांगितलं