WPL 2026: चौथ्या हंगामाची धमाकेदार सुरुवात; पहिल्या सामन्यापूर्वी जॅकलिन फर्नांडिस-यो यो हनी सिंगनं वाढवला 'ग्लॅमर'
महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामात पहिल्या सामन्यात गतविजेते मुंबई इंडियन्स आणि माजी विजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने येत आहेत.

Published : January 9, 2026 at 7:43 PM IST
नवी मुंबई MIW vs RCBW 1st Match : महिला प्रीमियर लीग 2026 च्या पहिल्या सामन्यात गतविजेते मुंबई इंडियन्स आणि माजी विजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने येत आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सनं दोनदा विजेतेपद जिंकलं आहे, तर स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं 2024 मध्ये ट्रॉफी जिंकली आहे. दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करुन विजेतेपद जिंकण्यास उत्सुक असलेल्या मजबूत खेळाडूंचा भरणा आहेत. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मंधानानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
🚨 Toss 🚨@RCBTweets won the toss against @mipaltan in the season opener and elected to bowl first.
— Women's Premier League (WPL) (@wplt20) January 9, 2026
Updates ▶️ https://t.co/IWU1URl1fr#TATAWPL | #KhelEmotionKa | #MIvRCB pic.twitter.com/2pdEsTzdYV
जॅकलिन फर्नांडिस, यो यो हनी सिंगनं नाणेफेकीनंतर वाढवला ग्लॅमर : टॉसनंतर, बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं तिच्या सादरीकरणानं प्रेक्षकांना चकित केले. तिने अनेक बॉलीवूड गाण्यांवर सादरीकरण केलं. तिच्या धाडसी कलाकारीनं तिनं स्टेडियममधील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. तिच्याशिवाय यो यो हनी सिंगनं त्याचं सुपरहिट गाणं "ब्लू आय"नं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. जॅकलिन फर्नांडिसनंतर रॅपर हनी सिंगनं सादरीकरण केलं. सादरीकरणादरम्यान त्यानं त्याची अनेक गाणी गायली. "मूछे को थोडा राउंड घुमा" या गाण्यानं त्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
Jacqueline Fernandez's special performance sets the stage on fire ahead of #TATAWPL 2026 season opener 🙌🔥#KhelEmotionKa | #MIvRCB | @Asli_Jacqueline pic.twitter.com/D7Yx2fM70o
— Women's Premier League (WPL) (@wplt20) January 9, 2026
कोणत्या स्वरुपात खेळवली जातेय स्पर्धा? : महिला प्रीमियर लीग 2026 मागील तीन हंगामांप्रमाणेच दुहेरी राउंड-रॉबिन स्वरुपात खेळली जाईल. नॉकआउट स्ट्रक्चर तेच राहील. पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेला संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघांना अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी एलिमिनेटरमध्ये सामना करावा लागेल. लीगपूर्वी एक मेगा खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी संघांना जास्तीत जास्त पाच खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी होती. नवीन संघ कसे कामगिरी करतात हे पाहणं मनोरंजक असेल.
Season 4⃣. Episode 1⃣
— Women's Premier League (WPL) (@wplt20) January 9, 2026
💙 🆚 ❤️
Bring on the #TATAWPL 2026 🥳
Updates ▶️ https://t.co/IWU1URl1fr#KhelEmotionKa | #MIvRCB pic.twitter.com/4u5OinBMp0
सामन्यासाठी दोन्ही संघ :
- मुंबई इंडियन्स महिला : नॅट सायव्हर-ब्रंट, जी कमलिनी (यष्टीरक्षक), अमेलिया केर, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, निकोला केरी, पूनम खेमनार, शबनीम इस्माईल, संस्कृती गुप्ता, सजीवन सजना, सईका इशाक.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु महिला : स्मृती मंधाना (कर्णधार), ग्रेस हॅरिस, दयालन हेमलता, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, नदीन डी क्लार्क, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, प्रेमा रावत, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल.
Presenting the Playing XIs of @mipaltan and @RCBTweets for Match 1⃣ 🙌
— Women's Premier League (WPL) (@wplt20) January 9, 2026
Live ▶️ https://t.co/IWU1URl1fr#TATAWPL | #KhelEmotionKa | #MIvRCB pic.twitter.com/e2Q5dj5DxK
हेही वाचा :
- 'आंतरराष्ट्रीय ग्रँड टूर सायकल स्पर्धा ठरणार विकासाचा मैलाचा दगड'; पुण्यात होणाऱ्या स्पर्धेच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
- Explainer: आईस स्कीइंग म्हणजे काय, तो का आहे धोकादायक? ज्यामुळं 'वेदांता'च्या मालकाच्या एकुलत्या एक मुलाचा झाला मृत्यू
- चक्क विजेच्या कडकडाटामुळं सामना करावा लागला रद्द; दक्षिण आफ्रिकेतील टी-20 लीगमध्ये अजब घटना

