28 दिवस, 22 सामने, 5 संघ; T-20 वर्ल्ड कपपूर्वी आजपासून WPL चा 'तडका'
महिला प्रीमियर लीग (WPL) चा चौथा हंगाम 9 जानेवारीपासून सुरु होत आहे. पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होईल.

Published : January 9, 2026 at 5:11 AM IST
मुंबई WPL 2026 : 2025 आता भूतकाळात जमा झालं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचं वनडे विश्वचषक विजेतेपद आठवणीत कोरलं गेलं आहे, परंतु क्रिकेट कधीही थांबत नाही. व्यस्त आंतरराष्ट्रीय हंगामानंतर, आता लक्ष भारताच्या प्रमुख महिला टी-20 लीग, महिला प्रीमियर लीग (WPL) वर केंद्रित झालं आहे. ही लीग 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान नवी मुंबई आणि बडोदा इथं खेळवली जाईल. चार आठवड्यांच्या हाय-व्होल्टेज क्रिकेटमध्ये 22 सामने असतील. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांना स्पर्धेत जेतेपद जिंकण्याचा अनुभव आहे, तर दिल्ली कॅपिटल्स प्रत्येक वेळी अंतिम फेरीत पोहोचले आहेत परंतु ते जिंकण्यात अपयशी ठरले आहेत. UP वॉरियर्स आणि गुजरात जायंट्सनं चमकदार कामगिरी केली आहे परंतु अजूनही ट्रॉफीची वाट पाहत आहेत.
5️⃣ Captains 🫡
— Women's Premier League (WPL) (@wplt20) January 7, 2026
1️⃣ Iconic Backdrop 🤩#TATAWPL 2026 Awaits ⏳#KhelEmotionKa pic.twitter.com/VuBw4PWDxY
मागील तीन हंगामांपेक्षा हा हंगाम वेगळा : हा हंगाम मागील तीन आवृत्त्यांपेक्षा वेगळा असेल. कारण, भारतीय संघाच्या यशानंतर, प्रेक्षकांचा उत्साह, स्टेडियममधील वातावरण आणि खेळाडूंची लोकप्रियता नवीन पातळीवर पोहोचली आहे. हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा आता फक्त चेहरे राहिलेले नाहीत तर राष्ट्रीय आयकॉन बनले आहेत. यावेळी, भारतीय महिला खेळाडू दबावाखाली नाही तर यशाच्या आत्मविश्वासानं स्पर्धेत उतरतील. त्या विश्वविजेत्या म्हणून प्रवेश करतील आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांचे सर्व प्रयत्न करतील. 2007 च्या टी-20 विश्वचषक विजयानंतर आयपीएलनं भारतीय पुरुष क्रिकेटपटूंचं नशीब बदलले, त्याचप्रमाणे, भारतीय महिला क्रिकेट संघ विजेता झाल्यानंतर, ही लीग आता खेळाडूंच्या यशासाठी उत्प्रेरक म्हणून पाहिली जाईल.
डब्ल्यूपीएलद्वारे टी-20 विश्वचषकाची तयारी : महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये इंग्लंडमध्ये होणार आहे, त्यामुळं महिला प्रीमियर लीग देखील खेळाडूंसाठी तयारीचं मैदान म्हणून काम करेल. येथील कामगिरी, कौशल्य आणि नियोजन थेट विश्वचषक संयोजनावर परिणाम करेल. गेल्या हंगामात क्रांती गौर, काश्वी गौतम आणि श्री चरणी सारख्या नवीन प्रतिभा निर्माण झाल्या आणि या हंगामातही नवीन नावं उदयास येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळं, WPL आता फक्त एक लीग राहिलेली नाही, तर भविष्यातील क्रिकेटपटू तयार करण्याची फॅक्टरी आहे.
Bright talents on the rise ⏫
— Women's Premier League (WPL) (@wplt20) January 7, 2026
Your pick for the Emerging Player Award in the upcoming season? 🤔✍️
Follow #TATAWPL 2026 from January 9 on https://t.co/rG3cQadgHN 💻 #KhelEmotionKa pic.twitter.com/dKUkMrKYPj
महिला प्रीमियर लीगचे सामने तुम्ही कधी आणि कुठं पाहू शकता? : या स्पर्धेत दुपारचे सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरु होतील, तर रात्रीचे सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता सुरु होतील. नाणेफेक अर्धा तास आधी होईल, म्हणजेच दुपारी 3:30 वाजता सुरु होणाऱ्या सामन्यांसाठी नाणेफेक दुपारी 3:00 वाजता होईल आणि संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होणाऱ्या सामन्यांसाठी नाणेफेक संध्याकाळी 7:00 वाजता होईल. महिला प्रीमियर लीग 2026 चे प्रसारण अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. सामन्यांचं थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार अॅपवर उपलब्ध असेल. तसंच तुम्ही ईटीव्ही भारतवरही सामन्यांचे अपडेट पाहू शकता.
मागील हंगामातील विजेते : 2023 आणि 2025 मध्ये मुंबई इंडियन्सनं विजेतेपद जिंकलं होतं, तर 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं विजेतेपद जिंकलं होतं. 2026 मध्ये कोणता संघ ट्रॉफी जिंकतो हे पाहणं मनोरंजक असेल. पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेला संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेले संघ एलिमिनेटरमध्ये खेळतील.
2-time champions #MumbaiIndians vs 1-time champions #RoyalChallengersBengaluru kick off TATA WPL 2026 💙❤️ Smriti’s calm meets Harmanpreet’s fire.
— Star Sports (@StarSportsIndia) January 8, 2026
Which team will start the TATA WPL with a win? 🤔#TATAWPL | #MIvRCB | FRI, 9 JAN, 6:00 PM pic.twitter.com/JrobsnA70e
स्पर्धा कोणत्या स्वरुपात खेळवली जाईल? : नेहमीप्रमाणे डब्ल्यूपीएल लीग स्वरुपात खेळवली जाईल. पाचही संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळतील. याचा अर्थ असा की प्रत्येक संघ स्पर्धेत आठ सामने खेळेल. लीग टप्पा संपल्यानंतर, पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेला संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघांमध्ये एलिमिनेटर होईल, ज्यातील विजेता संघ देखील अंतिम फेरीत पोहोचेल. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या संघांना बाहेर काढलं जाईल.
चौथ्या हंगामातही पाच संघ सहभागी : मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स. मुंबई, गुजरात आणि बेंगळुरु वगळता इतर सर्व संघांनी त्यांचे कर्णधार बदलले आहेत. दिल्लीचं नेतृत्व जेमिमा रॉड्रिग्ज करणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचं नेतृत्व मेग लॅनिंग करणार आहे, जिनं यापूर्वी तिन्ही हंगामात दिल्लीला अंतिम फेरीत नेलं होतं.
हेही वाचा :

