ETV Bharat / sports

सेमीफायनलचं तिकिट मिळवण्यासाठी भारतीय संघ उतरणार मैदानात; पहिल्यांदाच होणारा सामना 'इथं' दिसेल लाईव्ह

महिला टी-20 आशिया कप 2026 मध्ये भारतीय संघ आपला दुसरा गट सामना 3 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये हाँगकाँग चीनविरुद्ध खेळेल.

India Women vs Hong Kong Women T20I
भारतीय महिला क्रिकेट संघ (संग्रहित छायाचित्र) (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : September 3, 2026 at 10:18 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

दुबई India Women vs Hong Kong Women T20I : दुबई इथं खेळल्या जात असलेल्या महिला टी-20 आशिया कप 2026 मध्ये 'अ' गटात असलेल्या भारतीय महिला संघानं, 30 ऑगस्ट रोजी थायलंड महिला संघाविरुद्ध आपला पहिला सामना 94 धावांनी जिंकून स्पर्धेची शानदार सुरुवात केली. आता भारतीय संघ आपला दुसरा गट सामना 3 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये हाँगकाँग चीनविरुद्ध खेळेल आणि हा सामना जिंकून उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याचा संघाचा प्रयत्न असेल. सध्या, भारतीय संघ 'अ' गटाच्या गुणतालिकेत 2 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, त्यांचा नेट रन रेट अधिक 4,700 आहे, तर हाँगकाँग चीन शेवटच्या स्थानावर आहे.

भारतीय संघ पहिल्यांदाच हाँगकाँग चीनविरुद्ध मैदानात : भारतीय महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात हाँगकाँग चीनविरुद्ध खेळलेला नाही, त्यामुळं या दोन संघांमधील हा पहिलाच सामना असेल. भारतीय संघानं आतापर्यंत महिला टी-20 आशिया कप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि त्यांची कामगिरी पाहता, हा सामना जिंकणं फारसं कठीण वाटत नाही. या सामन्यात भारतीय महिला संघ आपल्या फलंदाजीची कामगिरी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करेल, कारण पहिल्या सामन्यात शेफाली वर्मा वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नव्हती आणि चाहत्यांना स्मृती मंधानाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. गोलंदाजीमध्ये, पहिल्या सामन्यात दुबईच्या संथ खेळपट्टीवर आपल्या फिरकी गोलंदाजीचं कौशल्य दाखवणाऱ्या दीप्ती शर्माकडून तशाच कामगिरीची अपेक्षा असेल.

सामना कधी, कुठं आणि कसा पाहायचा : महिला टी-20 आशिया कप 2026 मधील गट 'अ' चा भारत आणि हाँगकाँग चीन यांच्यातील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:00 वाजता सुरु होईल, तर नाणेफेक भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता होईल. या स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये दुबईच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं आहे आणि नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो, कारण लक्ष्याचा पाठलाग करणं सोपं राहिलेलं नाही. हा सामना भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल, तर सोनी लिव्ह ॲपवर ऑनलाइन स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

हेही वाचा :

  1. पहिल्यांदाच होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं भारतात आयोजन; फक्त दोन शहरात होणार सामने
  2. W,W,W,W,W,W,W... 5 धावांच्या बदल्यात घेतल्या 7 विकेट; कर्णधारानं केली आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी
  3. US Open Day 3: झ्वेरेव्हचा निसटता विजय! 40 वर्षीय मॉनफिल्सही चमकला; गॉफ-आंद्रीवा आणि एला पुढच्या फेरीत