ETV Bharat / sports

17 दिवस, 15 सामने, 8 संघ... आजपासून रंगणार आशिया कपचा थरार; कधी होणार भारत-पाकिस्तान युद्ध?

महिला आशिया कप आज, 28 ऑगस्टपासून युएईमध्ये आयोजित सुरु होत आहे. ही या स्पर्धेची 10 वी आवृत्ती आहे. आतापर्यंत भारतानं सात वेळा विजेतेपद पटकावलं आहे.

Women's Asia Cup 2026
आजपासून रंगणार आशिया कपचा थरार (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : August 28, 2026 at 10:33 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

दुबई Women's Asia Cup 2026 : महिला आशिया कप 2026 आज, 28 ऑगस्टपासून युएईमध्ये आयोजित सुरु होत आहे. ही या स्पर्धेची 10 वी आवृत्ती आहे. आतापर्यंत भारतानं सात वेळा विजेतेपद पटकावलं आहे, तर श्रीलंका आणि बांगलादेशनं प्रत्येकी एकदा विजेतेपद मिळवलं आहे. महिला आशिया कप 2004 मध्ये सुरु झाला. तेव्हापासून 2008 पर्यंत तो वनडे स्वरुपात खेळला जात होता. 2012 पासून तो टी-20 स्वरुपात आयोजित केला जात आहे. या स्पर्धेत श्रीलंका गतविजेता म्हणून मैदानात उतरेल.

भारतीय महिला संघाचा पहिला सामना 30 ऑगस्टला : महिला आशिया कप 2026 मध्ये आठ संघ सहभागी होत आहेत, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, युएई, थायलंड, हाँगकाँग आणि इंडोनेशिया. या संघांना दोन गटांमध्ये विभागलं आहे. गट 'अ' मध्ये हाँगकाँग, भारत, पाकिस्तान आणि थायलंड यांचा समावेश आहे. गट 'ब' मध्ये बांगलादेश, श्रीलंका, युएई, इंडोनेशिया आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. स्पर्धेतील पहिला सामना थायलंड आणि हाँगकाँग यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघ 30 ऑगस्ट रोजी थायलंडविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

महिला आशिया कप 2026 वेळापत्रक :

दिनांकसामना वेळ (IST) ठिकाण
28 ऑगस्ट 2026थायलंड महिला विरुद्ध हाँगकाँग महिलारात्री 8:00 वाजतादुबई
29 ऑगस्ट 2026श्रीलंका महिला विरुद्ध यूएई महिलारात्री 8:00 वाजतादुबई
30 ऑगस्ट 2026भारत महिला विरुद्ध थायलंड महिलारात्री 8:00 वाजतादुबई
31 ऑगस्ट 2026बांगलादेश महिला विरुद्ध इंडोनेशिया महिलारात्री 8:00 वाजतादुबई
1 सप्टेंबर 2026पाकिस्तान महिला विरुद्ध थायलंड महिलारात्री 8:00 वाजतादुबई
2 सप्टेंबर 2026श्रीलंका महिला विरुद्ध इंडोनेशिया महिलारात्री 8:00 वाजतादुबई
3 सप्टेंबर 2026भारत महिला विरुद्ध हाँगकाँग महिलारात्री 8:00 वाजतादुबई
4 सप्टेंबर 2026यूएई महिला विरुद्ध इंडोनेशिया महिलारात्री 8:00 वाजतादुबई
5 सप्टेंबर 2026भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिलारात्री 8:00 वाजतादुबई
6 सप्टेंबर 2026श्रीलंका महिला विरुद्ध बांगलादेश महिलारात्री 8:00 वाजतादुबई
7 सप्टेंबर 2026पाकिस्तान महिला विरुद्ध हाँगकाँग महिलारात्री 8:00 वाजतादुबई
8 सप्टेंबर 2026बांगलादेश महिला विरुद्ध यूएई महिलारात्री 8:00 वाजतादुबई
10 सप्टेंबर 2026सेमी फायनल-1रात्री 8:00 वाजतादुबई
11 सप्टेंबर 2026सेमी फायनल-2रात्री 8:00 वाजतादुबई
13 सप्टेंबर 2026अंतिम सामनारात्री 8:00 वाजतादुबई

अंतिम सामना 13 सप्टेंबर रोजी : गट फेरीतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिला उपांत्य सामना 10 सप्टेंबर रोजी आणि दुसरा 11 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. उपांत्य फेरीतील विजेते संघ 13 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या महिला आशिया कप 2026 च्या अंतिम सामन्यात प्रवेश करतील. 17 दिवसांच्या महिला आशिया कपमध्ये 15 सामने खेळवले जातील.

महिला आशिया कपचे सामने कधी आणि कुठं पाहावेत? : महिला आशिया कप 2026 चे सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येतील. थेट प्रक्षेपणासाठी, तुम्ही सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटला भेट देऊ शकता.

हेही वाचा :

  1. Hockey World Cup: भारताच्या लेकींची कमाल! 52 वर्षांनंतर केलं स्पर्धेतील सर्वोत्तम प्रदर्शन; नवनीतनं केले 2 गोल
  2. GCT Final: आर. प्रज्ञानानंदनं लिहिला नवा इतिहास! ग्रँड चेस टूर जिंकणारा ठरला पहिला भारतीय
  3. सोनलची एकाच सामन्यात दोन शतकं, पाच दिवसांच्या खेळानंतरही श्रीलंकेविरुद्ध दुसरी मॅच 'ड्रॉ'; भारतानं जिंकली मालिका