वैभवनं IPL मध्ये जिंकली ₹25 लाखांची कार, पण चालवल्यास होऊ शकते शिक्षा; कारण काय?
आयपीएल 2026 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीनं अनेक विक्रम करणारा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या चांगलाच चर्चेत आहे.

Published : June 1, 2026 at 7:35 AM IST
Vaibhav Sooryavanshi : आयपीएल 2026 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीनं अनेक विक्रम करणारा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या चांगलाच चर्चेत आहे. या मोसमात वैभवनं 237.30 च्या दमदार स्ट्राईक रेटनं 776 धावा केल्या. त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी त्याला आयपीएल 2026 मध्ये 'सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन' म्हणून गौरविण्यात आलं आणि अंदाजे 25 लाख रुपये किमतीची आलिशान टाटा सिएरा कार बक्षीस म्हणून देण्यात आली. मात्र तो याचा वापर करु शकणार नाही.
15-YEAR-OLD VAIBHAV SURYAVANSHI WITH ALL HIS AWARDS. 🫡
— Cricket Central (@CricketCentrl) June 1, 2026
- " this season will be remembered as a vaibhav suryavanshi's season." pic.twitter.com/JQjHJ64d83
इच्छा असूनही चालवू शकणार नाही गाडी : 'सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन'चं बक्षीस म्हणून एवढी आलिशान कार मिळूनही, वैभव सूर्यवंशी ती स्वतः चालवू शकणार नाही. यामागे एक महत्त्वाचं आणि रंजक कारण आहे. वैभव सूर्यवंशी फक्त 15 वर्षांचा आहे. भारतीय कायद्यानुसार, कायदेशीररित्या वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे, जे केवळ वयाच्या 18 वर्षांनंतरच मिळू शकते.
आणखी 3 वर्ष करावी लागणार प्रतीक्षा : भारतात, 18 वर्षांखालील व्यक्तीनं मोटार कार किंवा बाईक चालवणं हा कायदेशीर गुन्हा आहे. यामुळंच, आयपीएलमध्ये मोठ्या गोलंदाजांना चोप देणाऱ्या वैभवला, त्याची नवीन चकचकीत कार स्वतः चालवण्याची इच्छा असूनही ती चालवता येणार नाही आणि त्याला गाडी चालवण्यासाठी आणखी 3 वर्षे थांबावं लागेल.
आयपीएल 2026 मधील वैभवची कामगिरी : वैभव सूर्यवंशीनं आयपीएल 2026 मध्ये 16 सामन्यांमध्ये 48.50 च्या सरासरीनं 776 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 237.30 होता. या हंगामात वैभवनं एक शतक आणि पाच अर्धशतकं झळकावली. त्याची सर्वोच्च धावसंख्या 103 होती. संपूर्ण हंगामात वैभवनं 63 चौकार आणि 72 षटकार मारले.
Swept the field with his skills. Swept the season with awards 🏆
— IndianPremierLeague (@IPL) May 31, 2026
1️⃣5️⃣ years old and already needing a bigger trophy cabinet 👏#TATAIPL | #Final | #TheFinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/bIYKIHfgRD
आयपीएलमध्ये 2026 मध्ये वैभवनं मिळवलेले अवार्ड :
- ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) : वैभवनं या हंगामात 16 सामन्यांमध्ये एकूण 776 धावा केल्या. त्याला सर्वाधिक धावा केल्याबद्दल 'ऑरेंज कॅप' मिळाली आणि 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं.
- सर्वाधिक मौल्यवान खेळाडू (MVP) : संपूर्ण हंगामात सर्वोत्तम खेळाडू ठरल्याबद्दल त्याला 'हंगामातील सर्वाधिक मौल्यवान खेळाडू' म्हणून गौरविण्यात आलं. त्यानं 16 सामन्यांमध्ये एकूण 436.5 गुण मिळवले. या पुरस्कारासाठी त्याला 15 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं.
- सीझनचा सुपर स्ट्रायकर : वैभवनं या सीझनमध्ये 237.30 च्या धडाकेबाज स्ट्राइक रेटनं धावा केल्या, जो सर्व फलंदाजांमध्ये सर्वाधिक होता. यासाठी त्याला टाटा सिएरा पुरस्कार मिळाला.
- सीझनचा उदयोन्मुख खेळाडू : आयपीएल 2026 सीझनमधील उत्कृष्ट फलंदाजीच्या कामगिरीबद्दल वैभव सूर्यवंशीला उदयोन्मुख खेळाडू पुरस्कार मिळाला, ज्यासाठी त्याला एक ट्रॉफी आणि 10 लाख रुपये मिळाले.
- सीझनमध्ये सर्वाधिक सिक्स : त्यानं या सीझनमध्ये एकूण 72 षटकार मारुन, एकाच सीझनमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा महान फलंदाज ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडला. या पुरस्कारासाठी त्याला 10 लाख रुपयांचा चेकही मिळाला.
हेही वाचा :

