IND vs WI सामना पावसात रद्द झाला तर सेमीफायनलमध्ये कोण जाणार?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सुपर-8 सामना हा व्हर्च्युअल क्वार्टरफायनलसारखा असेल.

Published : February 27, 2026 at 10:22 AM IST
कोलकाता IND vs WI Match : 2026 च्या टी-20 विश्वचषकात सध्या सुपर-8 सामने सुरु आहेत. 26 फेब्रुवारी रोजी दोन सुपर-8 सामने खेळवण्यात आले. दिवसाचा दुसरा सामना भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात झाला. टीम इंडियानं हा सामना 72 धावांनी जिंकला आणि त्यांच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी, आता भारताला वेस्ट इंडिजविरुद्धचा शेवटचा सामना जिंकावा लागेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सुपर-8 सामना हा व्हर्च्युअल क्वार्टरफायनलसारखा असेल.
THE QUARTER FINAL AT EDEN GARDENS ON SUNDAY IND vs WI:
— MANU. (@IMManu_18) February 26, 2026
India vs West Indies.
2 time Champions Indian team
2 time Champions west Indies
TEAM INDIA - Kolkata to Wankhede to Ahmedabad - 3 games, 3 wins, history awaits for Captain Suryakumar Yadav & his army.!!🇮🇳 pic.twitter.com/3rq8riXgre
टीम इंडियाचा सुपर-8 मधील शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध : भारत सुपर-8 फेरीत 1 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळेल. या सामन्यात जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करेल. या सामन्यापूर्वी, चाहते विचार करत आहेत की जर भारत आणि वेस्ट इंडिजमधील सामना पावसामुळं रद्द झाला तर काय होईल. सामना रद्द झाल्यास टीम इंडिया सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकेल का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना रद्द झाला तर काय होईल? : जर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील उपांत्य सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या परस्थितीत, भारताला तीन गुण मिळतील आणि वेस्ट इंडिजला तीन गुण मिळतील. परंतु, वेस्ट इंडिजचा नेट रन रेट चांगला असेल तर वेस्ट इंडिज उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल आणि टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर पडेल. टीम इंडियाचा नेट रन रेट सध्या उणे 0.100 आहे, तर वेस्ट इंडिजचा नेट रन रेट +1.791 आहे. आता, टीम इंडियाकडे विश्वचषक उपांत्य फेरीत पोहोचण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे विजय. टीम इंडिया येथून सामना जिंकूनच सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते.
अगर India vs West Indies मैच रद्द हो गया तो:
— Sushmita Yadav (@SushmitaGZP) February 26, 2026
WI = 3 अंक (NRR +1791)
IND = 3 अंक (NRR -0.100)
👉 West Indies सेमीफाइनल में जाएगी !
📌 भारत केवल IND vs WI मैच जीतकर ही सेमीफाइनल में जा सकती है।
हमे पहले इंद्र देव 🌧️ 🌧️ को मनाना है
उसके बाद जीत की प्रार्थना 🙏 🙏 करनी है pic.twitter.com/mUomJVIG6H
टीम इंडियानं या विश्वचषकात आतापर्यंत गमावला एकच सामना : टीम इंडियानं या विश्वचषकात शानदार कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना वगळता, टीम इंडियानं आतापर्यंत सर्व सामने जिंकले आहेत. पहिल्या सुपर-8 सामन्यात, टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी पराभव स्विकारावा लागला. त्यापूर्वी, टीम इंडियानं ग्रुप स्टेजमधील सर्व चारही सामने जिंकले होते. त्यांच्या शेवटच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेला 72 धावांनी पराभूत केलं.
हेही वाचा :

