IPL चा नवा हंगाम कधी सुरु होणार? समोर आली मोठी अपडेट
आयपीएल 2026 ची तयारी आधीच सुरु झाली आहे. अनेक संघांनी त्यांची सराव शिबिरेही सुरु केली आहेत.

Published : February 28, 2026 at 9:59 AM IST
मुंबई IPL 2026 Date : आयपीएल 2026 ची तयारी आधीच सुरु झाली आहे. अनेक संघांनी त्यांची सराव शिबिरेही सुरु केली आहेत. दरम्यान, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ही आयपीएल सुरु होण्याची शक्यता असल्याचं वृत्त आहे. मात्र, बीसीसीआयनं अद्याप वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. अशातच आता आयपीएल दोन दिवसांनी पुढं ढकललं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पहिल्या सामन्याची तारीख निश्चित झालेली नाही.
🚨 Cricbuzz understands IPL 2026 start may be delayed by 2 days
— Cricbuzz (@cricbuzz) February 27, 2026
An official announcement is expected soon pic.twitter.com/wMVnKpSdK9
कधी होणार आयपीएलचा पहिला सामना : बीसीसीआयनं अद्याप आयपीएल 2026 चा पहिला सामना कधी खेळवला जाईल याची घोषणा केलेली नाही. पूर्वी पहिला सामना 26 मार्च रोजी खेळवला जाईल अशी अपेक्षा होती, परंतु आता ही तारीख एक किंवा दोन दिवसांनी पुढं ढकलली जाऊ शकते असं दिसतं. बीसीसीआयनं याची पुष्टी केलेली नाही. क्रिकबझनं वृत्त दिलं आहे की बीसीसीआय पहिला सामना 28 मार्च रोजी आयोजित करु शकते, परंतु 29 मार्चचा देखील विचार केला जात आहे. हे लक्षात घ्यावं की 28 तारखेला शनिवार आहे आणि 29 तारखेला रविवार आहे. हे चाहत्यांसाठी फायदेशीर देखील असू शकते.
आयपीएलचा अंतिम सामना कधी : दरम्यान, बीसीसीआय मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण आयपीएल हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्याची अपेक्षा आहे. बीसीसीआयनं 26 मार्च रोजी आयपीएल सुरु होण्याची घोषणा केलेली नसली तरी, अंतर्गत चर्चा झाली आहे. तसंच, जेव्हा लिलाव झाला तेव्हा संघांसाठी ही संभाव्य तारीख होती. सुरुवातीला 31 मे रोजी अंतिम सामना होणार होता, परंतु आता असं दिसते की हा देखील पुढे ढकलला जाऊ शकतो. मात्र, हे सर्व तपशील अद्याप जाहीर झालेलं नाही.
🚨 IPL 2026 SCHEDULE TO BE ANNOUNCED SOON! 🚨
— MD Raju 🇮🇳 (@MDRaju_Live) February 27, 2026
- The start of IPL 2026 could be delayed by two days. The expected new start date is March 28. [Cricbuzz] 🔥 pic.twitter.com/rvcQTNhxtv
विधानसभा निवडणुकीमुळं वेळापत्रकाला विलंब : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका आयपीएलसोबत होण्याची शक्यता आहे. त्यामुळं निवडणुकीच्या तारखांशी टक्कर होऊ नये म्हणून आयपीएलचे सामने पुढं ढकलण्यात येत आहेत. निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतरच आयपीएलचं वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय सुरुवातीला घेण्यात आला होता. मात्र, आता झालेला विलंब लक्षणीय आहे, त्यामुळं पुढील आठवड्यात वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. आता फक्त अर्धे वेळापत्रक जाहीर केलं जाईल, परंतु निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं जाईल आणि कोणतेही बदल नंतर जाहीर केले जातील.
हेही वाचा :

