ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर WTC गुणतालिकेत उलथापालथ; टीम इंडियाची स्थिती काय?

सिडनी कसोटीत विजयासह, ऑस्ट्रेलियन संघानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-27 गुणतालिकेत आपलं स्थान मजबूत केलं आहे.

Updates WTC Point Table
ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर WTC गुणतालिकेत उलथापालथ (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : January 8, 2026 at 10:13 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सिडनी Updates WTC Point Table : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट संघातील अ‍ॅशेस 2025-26 मालिकेतील शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियन संघानं या सामन्यात 5 विकेट्सनं विजय मिळवत अ‍ॅशेस ट्रॉफी कायम ठेवली आणि मालिका 4-1 अशी जिंकली. सिडनी कसोटीत, ऑस्ट्रेलियासमोर शेवटच्या दिवशी 160 धावांचं लक्ष्य होतं, जे त्यांनी 31.2 षटकांत 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या विजयासह, ऑस्ट्रेलियन संघानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-27 गुणतालिकेत आपलं स्थान मजबूत केलं आहे आणि अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. मात्र, या पराभवामुळं इंग्लंडच्या गुणांची टक्केवारी कमी झाली आहे.

ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर कायम : सिडनी कसोटीनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-27 मध्ये ऑस्ट्रेलियाचा 8 सामन्यांमधील हा सातवा विजय आहे, ज्यामुळं त्यांचे एकूण गुण 84 झाले आहेत, तर त्यांची गुणांची टक्केवारी 87.5 आहे. इंग्लंड संघाबद्दल बोलायचं झाले तर, हे WTC चक्र एका दुःस्वप्नापेक्षा कमी राहिलेलं नाही, 10 सामन्यांपैकी त्यांचा सहावा पराभव आणि फक्त तीन विजय आहेत. इंग्लंडची गुणांची टक्केवारी 31.66 आहे.

टीम इंडिया कोणत्या स्थानावर : टीम इंडियाबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या WTC 2025-27 च्या पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत, त्यांनी नऊ सामने खेळले आहेत, त्यापैकी चार जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत. भारतीय संघाची गुणांची टक्केवारी सध्या 48.15 आहे. ऑस्ट्रेलिया सध्या अव्वल स्थानावर आहे, तर न्यूझीलंड 77.78 गुणांच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर : टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेनं 2025-27 च्या WTC मध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे, 75 गुणांच्या टक्केवारीसह संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर श्रीलंका 66.67 गुणांच्या टक्केवारीसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान 50 गुणांच्या टक्केवारीसह पाचव्या क्रमांकावर आहे. बांगलादेश आणि वेस्ट इंडिज अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचा :

  1. बॅझबॉलचा 'बँडबाजा'; ऑस्ट्रेलिया बनला 'अ‍ॅशेस'चा बादशाह, 4-1 नं मालिका विजय
  2. वैभव सूर्यवंशीचं चौथ्या देशाविरुद्ध शतक; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी करताच रचला इतिहास
  3. जेकब बेथेलच्या शतकानंतरही इंग्लंडचा संघ बॅकफूटवर; प्रतिष्ठित मालिकेचा शेवट निर्णायक वळणावर