WAPL 2026: रामोजी ग्रुपनं सर्वाधिक बोली लावत विकत घेतला अमरावती संघ; कधी सुरु होणार ही लीग?
क्रिकेटमध्ये महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी, आंध्र क्रिकेट असोसिएशननं (ACA) महिला आंध्र प्रीमियर लीग (WAPL) सुरु केली आहे.

Published : August 27, 2026 at 11:00 AM IST
विजयवाडा WAPL 2026 : क्रिकेटमध्ये महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी, आंध्र क्रिकेट असोसिएशननं (ACA) महिला आंध्र प्रीमियर लीग (WAPL) सुरु केली आहे. ही लीग 15 ते 26 सप्टेंबर दरम्यान मंगलागिरी येथील एसीए स्टेडियमवर खेळवली जाईल. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिची लीगची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
स्पर्धेत चार संघ होणार सहभागी : या स्पर्धेत एकूण चार संघ सहभागी होतील. यापैकी एक संघ रामोजी ग्रुपच्या उषादय एंटरप्रायझेसनं 89 लाख रुपयांची सर्वोच्च बोली लावून विकत घेतला असून, त्याचं नाव 'अमरावती ई-चॅम्पियन्स' असं ठेवलं आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, तेलंगणा प्रीमियर लीगच्या (TG20 2026) पहिल्या हंगामात रामोजी ग्रुपच्या 'हैदराबाद ई-चॅम्पियन्स' संघानं विजेतेपद पटकावलं होतं.

WAPL 2026 संघ आणि त्यांचे मालक -
- अमरावती ई-चॅम्पियन्स: (रु. 89 लाख) उषादय एंटरप्रायझेस
- रायलसीमा झेन स्टार्स: (रु. 85.59 लाख) गॅरिसन कन्स्ट्रक्शन्स
- विझाग फायर बर्ड्स: (रु. 77.77 लाख) ओरा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
- गोदावरी गोल्डन ईगल्स: एनएसआर इंडस्ट्रीज (रु. 61.11 लाख)
खेळाडूंचा लिलाव : स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चार संघांसाठी विजयवाडा इथं झालेला खेळाडूंचा लिलाव खूपच रोमांचक होता. फ्रँचायझींनी एकूण 74 महिला क्रिकेटपटूंना त्यांच्या संघात सामील करुन घेतलं. अष्टपैलू खेळाडू हरनिता प्लाविया लिलावातील सर्वात महागडी क्रिकेटपटू ठरली, तिला गोदावरी गोल्डन ईगल्स फ्रँचायझीनं रु. 4.30 लाखांना विकत घेतलं. याशिवाय, 12 वर्षीय शन्मुख प्रियाला रायलसीमा झेन स्टार्स संघात सामील करुन घेण्यात आलं, ज्यामुळं ती WAPL मधील सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. एवढ्या लहान वयात या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळणं, हे तिच्या क्रिकेट कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. सहभागी झालेल्या चार फ्रँचायझींनी आपापल्या बजेटमधून प्रमुख खेळाडूंची निवड केली. खेळाडू खरेदी करण्यासाठी प्रत्येक फ्रँचायझीला 15 लाख रुपयांचा मर्यादा देण्यात आला होता. प्रत्येक संघाला किमान 18 आणि कमाल 20 क्रिकेटपटू निवडण्याची परवानगी होती.
अमरावती ई-चॅम्पियन्सचा संघ : नीरागट्टू अनुषा (2.10 लाख), कंद्रेगुला देविका (2 लाख), कत्रागड्डा दीक्षा (1.90 लाख), शबनम शकील (1.30 लाख), पी. रंगलक्ष्मी (1 लाख), तरुणी जोशी (1.20 लाख), कट्टा महंती श्री (85 हजार), के. हंसा (60 हजार), अंकम विष्णुप्रिया (60 हजार), हेमासाई राम्या (55 हजार), सैपुजिथा (50 हजार), नक्का सना (45 हजार), ओरुगंती साहितश्री (40 हजार), एम. रुक्सर, तबस्सुम, साईदीप्ति, बोद्दुपल्ली तनिष्का, टी. मल्लिका और एम. सहस्र रेड्डीला 30 हजार रुपयांमध्ये खरेदी केलं.
हेही वाचा :

