VHT 2025-26: उपांत्यपूर्व फेरीसाठी 8 संघ ठरले; राज्यातील दोन संघांचा समावेश
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मधील गट टप्प्यातील सामने पूर्ण झाल्यानंतर, उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणाऱ्या 8 संघांची नावं निश्चित झाली आहेत, ज्यामध्ये मुंबई संघ कर्नाटकचा सामना करेल.

Published : January 9, 2026 at 12:52 PM IST
मुंबई Vijay Hazare Trophy 2025-26 : भारतीय घरगुती क्रिकेटमधील प्रमुख लिस्ट-ए स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम गट टप्प्यातील सामने 8 जानेवारी रोजी खेळवण्यात आले, ज्यामुळं उपांत्यपूर्व फेरीतील संघांचा निर्णय झाला. विजय हजारे ट्रॉफी एलिट स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी झाले होते, ज्यांना प्रत्येकी आठ गटात विभागण्यात आलं होतं. गट अ मधून कर्नाटक आणि मध्य प्रदेशनं आपलं स्थान निश्चित केलं, तर उत्तर प्रदेश आणि विदर्भानं गट ब मधून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गट क मधून पंजाब आणि मुंबई, तसंच गट ड मधून दिल्ली आणि सौराष्ट्र यांनी आपलं उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केलं.
Quarter-finalists confirmed ✅
— Cricbuzz (@cricbuzz) January 9, 2026
Who goes all the way?🏆#VijayHazareTrophy pic.twitter.com/OTyJaAiFSY
मुंबईचा कर्नाटकशी होणार सामना : विजय हजारे ट्रॉफी 2025-26 च्या अंतिम फेरीतील आठ उपांत्यपूर्व फेरीतील संघांचा निर्णय झाल्यानंतर, नॉकआउट सामने 12 जानेवारी रोजी सुरु होतील. पहिला उपांत्यपूर्व सामना कर्नाटक आणि मुंबई यांच्यात होईल, तर दुसरा सामना उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्र यांच्यात होईल. दोन्ही सामने 12 जानेवारी रोजी बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंडवर खेळवले जातील. तिसरा आणि चौथा उपांत्यपूर्व सामना 13 जानेवारी रोजी खेळवण्यात येईल, ज्यामध्ये दिल्लीचा सामना विदर्भाशी आणि पंजाबचा सामना मध्य प्रदेशशी होईल.
उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचं ठिकाण निश्चित : उपांत्य फेरीचे सामने संपल्यानंतर, पहिला उपांत्य सामना 15 जानेवारी रोजी पहिल्या आणि चौथ्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील विजेत्या संघांमध्ये खेळवला जाईल. दुसरा उपांत्य सामना 16 जानेवारी रोजी तिसऱ्या आणि चौथ्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील विजेत्या संघांमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर 18 जानेवारी रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होईल, हे सर्व सामने बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंडवर खेळवले जातील.
हेही वाचा :

