ETV Bharat / sports

15 वर्षीय वैभवचा धुरळा! 42 चेंडूत अर्धशतक ठोकलं अन् 57 वर्षांचा विक्रम इतिहासजमा

युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीनं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जे आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला साध्य करता आलं नाही, ते त्यानं करुन दाखवलं आहे.

Vaibhav Sooryavanshi
वैभव सूर्यवंशी (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : August 31, 2026 at 12:50 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

बेंगळुरु Vaibhav Sooryavanshi : युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीनं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जे आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला साध्य करता आलं नाही, ते त्यानं करुन दाखवलं आहे. वैभव सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला असला तरी, दुसऱ्या सामन्यात त्यानं शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. आता तो या स्पर्धेत अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.

पहिल्या सामन्यात वैभव झाला होता आठ धावांवर बाद : यावेळी दुलीप ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशी 'ईस्ट झोन' संघाकडून खेळत आहे. संघानं आपला पहिला सामना ईशान्य विभागाविरुद्ध खेळला, जो त्यांनी जिंकला. त्या सामन्यात वैभव सूर्यवंशीनं फार काही केलं नसलं तरी, तो केवळ आठ धावांवर बाद झाला, पण दोन बळी घेऊन त्यानं नक्कीच लक्ष वेधून घेतलं. संघानं एक डाव राखून विजय मिळवल्यानं, त्याला सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही.

दुलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन संघात सामना : सध्या ईस्ट झोनचा सामना सेंट्रल झोनशी होत आहे. यात प्रथम फलंदाजी करताना सेंट्रल झोननं 266 धावा केल्या. यानंतर सोमवारी ईस्ट झोनसाठी वैभव सूर्यवंशी आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी डावाची सुरुवात केली. या सामन्यात वैभव सूर्यवंशीनं आपल्या खास फलंदाजीचं प्रदर्शन केलं. त्यानं शानदार फलंदाजी करत अवघ्या 42 चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं एक षटकारही मारला. त्यानं विरोधी संघाला दोन संधी दिल्या, पण झेल सोडून संघानं त्या गमावल्या.

वैभवनं लक्ष्मण सिंग यांचा 57 वर्षांचा विक्रम मोडला : वैभव सूर्यवंशीनं अर्धशतक पूर्ण करताच, तो दुलीप ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला. आज, 31 ऑगस्ट रोजी, वैभव 15 वर्षे आणि 157 दिवसांचा झाला आहे. यापूर्वी, लक्ष्मण सिंग यांनी 1969 मध्ये वयाच्या 16 वर्षे आणि 23 दिवसांनी दुलीप ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. या यादीत पियुष चावला तिसऱ्या क्रमांकावर आहे. पियुष चावलानं 2005 साली वयाच्या 16 वर्षे आणि 307 दिवसांच्या वयात ही कामगिरी केली.

वैभवचं शतक हुकलं : अर्धशतक पूर्ण करूनही वैभव थांबला नाही आणि फलंदाजी करत राहिला. मात्र त्याचं शतक आठ धावांनी हुकलं. वैभवनं 79 चेंडूंमध्ये सात चौकार आणि सात षटकारांसह 92 धावांची खेळी केली. त्यानं 116.46 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली. आणखी एक षटकार मारण्याच्या प्रयत्नात त्याचं शतक हुकलं.

हेही वाचा :

  1. US Open 2026: जोकोविचचं 25वं ग्रँड स्लॅम जिंकण्याचं स्वप्न पुन्हा भंगलं! पहिल्याच फेरीत पराभवानं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
  2. 0 धावा देत घेतल्या 3 विकेट; दिप्ती बनली जगातील अव्वल गोलंदाज
  3. जर्मनीनं सलग दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक; पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी