ETV Bharat / sports

"विजेतेपद कायम राखण्याचं आव्हान, पण...", सिद्धेश लाडची 'ईटीव्ही भारत'सोबत खास बातचीत

मुंबई टी-20 लीगच्या तिसऱ्या मोसमाचे विजेते मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्सच्या यंदाच्या मोसमातील जर्सीचं गुरूवारी मुंबईत अनावरण करण्यात आलं.

Intraction with Mumbai T20 league last season winning champion Siddhesh Lad
मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स संघाच्या जर्सीचं मुंबईत अनावरण. (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2026 at 8:18 PM IST

|

Updated : May 28, 2026 at 8:46 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : आयपीएल संपल्यानंतर लगेचच म्हणजे दुसऱ्याच दिवसापासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एमसीए आयोजित मुंबई टी-20 लीगचा चौथा हंगाम सुरू होतोय. यंदाच्या मोसमाकरता घेतलेल्या लिलावात पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत मिळून एकूण 2,411 खेळाडूंचा सहभाग होता. दरम्यान, मुंबई टी-20 लीगच्या तिसऱ्या मोसमाचे विजेते मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्सच्या यंदाच्या मोसमातील जर्सीचं गुरूवारी (दि.28) मुंबईत अनावरण करण्यात आलं. त्यावेळी कर्णधार सिद्धेश लाड यानं "ईटीव्ही भारत"ला दिलेल्या खास मुलाखतीत मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी, "विजेतेपद कायम राखण्याचं आव्हान असलं तरी त्याचं दडपण बिलकुल नाही," असं सिद्धेशनं हसत हसत सांगितलं.

"विजेतेपद कायम राखण्याचं आव्हान, पण...", सिद्धेश लाडची 'ईटीव्ही भारत'सोबत खास बातचीत (ETV Bharat Reporter)

वानखेडेच्या स्टेडियमवर खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव : दरम्यान, मुंबईकडून गेली अनेक वर्ष वानखेडेच्या स्टेडियमवर क्रिकेट खेळण्याचा सिद्धेशकडे प्रदीर्घ अनुभव आहे. रणजी सामना असो किंवा मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा, मुंबईचा फलंदाजी कणा म्हणून सिद्धेशकडे पाहिलं जातं. फिटनेस आणि कामगिरीच्या जोरावर सिद्धेशनं टीममधील सातत्यपूर्ण कामगिरीनं स्वत:ची अशी एक जागा निर्माण केलीय. त्यात मुंबई टी-20 लीगमध्ये मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्सचं नेतृत्त्व करत असताना सिद्धेशमधील नेतृत्त्व गुणांचीही चमक गेल्या मोसमाता पाहायला मिळाली होती. सिद्धेशचे वडील दिनेश लाड हे देखील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट कोच आहेत. त्यांनी रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर सारखे प्रतिभावान क्रिकेटपटू घडवले आहेत. त्यामुळं सिद्धेशला क्रिकेटचं बाळकडू कुठून मिळालंय, हे काही वेगळं सांगायला नको.

Intraction with Mumbai T20 league last season winning champion Siddhesh Lad
मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स संघाच्या जर्सीचं मुंबईत अनावरण. (ETV Bharat Reporter)



कशी असेल यंदाची स्पर्धा? : मुंबईकर क्रिकेट चाहत्यांमध्ये यंदाच्या पर्वासाठी मोठी उत्सुकता पाहायला मिळतेय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बहुप्रतिक्षित मुंबई टी-20 लीगच्या चौथ्या पर्वाला सोमवारपासून सुरुवात होतेय. यंदा या स्पर्धेत दोन नव्या संघांसह एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. ज्यात मुंबईच्या भौगोलिक स्थितीवर आधारीत आठ विभागवार संघांचा समावेश आहे. 1 ते 13 जून दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.



मुंबई टी -20 लीगमधील सहभागी संघ

  • आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स
  • ईगल ठाणे स्ट्रायकर्स
  • मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स
  • नॉर्थ मुंबई पँथर्स
  • सोबो मुंबई फॅल्कन्स
  • ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट
  • आर्क्स अंधेरी
  • बांद्रा ब्लास्टर्स

मुंबई टी-20 लीगनं टीम इंडियाला दिलेत दोन मोहरे : साल 2018 साली सुरू झाल्यापासून मुंबई टी-20 लीग ही देशांतर्गत क्रिकेटमधील एक आघाडीची स्थानिक क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. यात आपल्या कामगिरीची चमक दाखवून शिवम दुबे आणि तुषार देशपांडे सारख्या क्रिकेटर्सनी टीम इंडियात आपलं स्थान मिळवलं आहे. याशिवाय श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव यांनी गेल्या मोसमांत या स्पर्धेत खेळून मुंबईकर क्रिकेट रसिकांची मनं जिंकली होती. त्यामुळं यंदाचा चौथा मोसमही मुंबईकर क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणी असेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

हेही वाचा :

  1. क्वालिफायर-2 न खेळता अंतिम फेरीत पोहोचणार गुजरात? 'या' समीकरणानं उडवली राजस्थानची झोप
  2. IPL दरम्यान टीम इंडिया उतरणार मैदानात; T20I वर्ल्ड कपपूर्वी होणार 'लिटमस टेस्ट'


Last Updated : May 28, 2026 at 8:46 PM IST