ETV Bharat / sports

TG20 लीग : हैदराबाद ई-चॅम्पियन्सचा सलग सहावा विजय; करीमनगर डायमंड्सला चारली धूळ

TG20 लीगमध्ये, 'हैदराबाद ई-चॅम्पियन्स'नं पुन्हा एकदा दमदार अष्टपैलू कामगिरी केली. 'हैदराबाद ई-चॅम्पियन्स'नं 'करीमनगर डायमंड्स'चा सात गडी राखून पराभव करत सलग सहावा विजय नोंदवला.

TG20 League Hyderabad e Champions
अखिल राठोड (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 4, 2026 at 11:00 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (HCA) द्वारे आयोजित TG20 लीगमध्ये, 'हैदराबाद ई-चॅम्पियन्स'नं पुन्हा एकदा दमदार अष्टपैलू कामगिरी केली. 'हैदराबाद ई-चॅम्पियन्स'नं 'करीमनगर डायमंड्स'चा सात गडी राखून पराभव करत सलग सहावा विजय नोंदवला. आधीच प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित केलेल्या 'हैदराबाद ई-चॅम्पियन्स'चं या स्पर्धेतील विजयी अभियान अजूनही अबाधित आहे. त्यांचा लीग फेरीतील शेवटचा सामना सोमवार 6 जुलैला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 'अनुराग नलगोंडा नाइट्स' विरुद्ध खेळवण्यात येणार आहे.

TG20 League Hyderabad e Champions
मार्गदर्शी चिटफंडच्या संचालक शैलजा किरण (ETV Bharat)

'करीमनगर डायमंड्स'नं दिलं 186 धावांचं लक्ष्य : शनिवारी झालेल्या सामन्यात, प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 'करीमनगर डायमंड्स'नं 20 षटकांत 6 बाद 186 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यानंतर 'हैदराबाद ई-चॅम्पियन्स'नं वैष्णव रेड्डीच्या आक्रमक अर्धशतकाच्या (42 चेंडूत नाबाद 65 धावा) जोरावर हा सामना सहजपणे जिंकला. 'हैदराबाद ई-चॅम्पियन्स'नं संघानं 11 चेंडू शिल्लक असतानाच हे लक्ष्य गाठलं.

TG20 League Hyderabad e Champions
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

पहिल्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी : 'हैदराबाद ई-चॅम्पियन्स'साठी सलामीवीर अभिरथ रेड्डी (16 चेंडूत 26 धावा) आणि साई विकास रेड्डी (17 चेंडूत 36 धावा) यांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी केली. मात्र, सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते वैष्णवनं. त्यानं प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समाचार घेत त्यांना पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं. गडगू गणेशनंही (13 चेंडूत 21 धावा) वैष्णवला उत्तम साथ देत आपली भूमिका चोख बजावली. 12 व्या षटकात गणेश बाद झाल्यानंतर, वैष्णव आणि प्रणव वर्मा (21 चेंडूत नाबाद 38 धावा) यांनी संघाची आणखी पडझड होऊ दिली नाही. या जोडीनं प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला.

वैष्णवनं खणकावले तीन चौकार आणि चार षटकार : वैष्णवच्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता, तर वर्मानं चार चौकार आणि एक षटकार लगावला. गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार मारून वैष्णवनं शानदार पद्धतीनं सामना संपवला आणि ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषाला सुरुवात झाली.

हेही वाचा :

  1. TG20 लीग : हैदराबाद ई-चॅम्पियन्सची प्ले-ऑफमध्ये धडक; अभिरथ रेड्डीचं वादळी शतक, वारंगल वॉरियर्सचा धुव्वा
  2. 'हैदराबाद ई चॅम्पियन्स'चा 'अन्विता खम्मम एसेस'वर शानदार विजय
  3. टीजी-20 लीगमध्ये 'हैदराबाद ई-चॅम्पियन्स'चा जलवा; सलग तीन विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप