ETV Bharat / sports

120 चेंडूंच्या सामन्यात 73 चेंडू शिल्लक ठेवत मिळवला विजय! प्रतिस्पर्धी संघाचा एकतर्फा उडवला धुव्वा

महिला आशिया कप 2026 च्या दुसरा सामन्यात श्रीलंकेनं युएईला 9 गडी राखून पराभूत करत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय नोंदवला.

Biggest win in T20I
120 चेंडूंच्या सामन्यात 73 चेंडू शिल्लक ठेवत मिळवला विजय! (IANS (File Photo))
author img

By ETV Bharat Sports Team

Published : August 30, 2026 at 7:38 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

दुबई Biggest win in T20I : महिला आशिया कप 2026 चा दुसरा सामना श्रीलंका आणि युएई महिला क्रिकेट संघात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेनं युएईला 9 गडी राखून पराभूत करत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना युएईचा संघ 19.5 षटकांत अवघ्या 79 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात, श्रीलंकेच्या महिला संघानं हे लक्ष्य केवळ 7.5 षटकांत 9 गडी आणि 73 चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केलं. शिल्लक राहिलेल्या चेंडूंचा विचार करता, हा श्रीलंकेचा आजपर्यंतचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठा आणि प्रभावी विजय आहे.

युएईच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी : नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या युएई संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सामन्याच्या चौथ्या चेंडूवर तीर्था सतीश शून्यावर बाद झाली आणि जेव्हा संघाची धावसंख्या 9 धावांवर पोहोचली, तेव्हा लावण्या केनी (3 धावा) देखील बाद झाली. कर्णधार ईशा ओझा (18 धावा) आणि हीना होच्चंदानी (10 धावा) यांनी सावधपणे खेळत तिसऱ्या विकेटसाठी 19 धावा जोडल्या. त्यानंतर रिनिथा रजिथा (15 धावा) हिने समायरा आणि मेहुल कुलकर्णी (3 धावा) यांच्यासोबत छोट्या भागीदारी करुन संघाला 50 धावांच्या पुढं नेलं. मात्र या प्रयत्नांनंतरही, संपूर्ण यूएई संघ 19.5 षटकांत केवळ 79 धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेकडून, गोलंदाजीत मिताली अयोध्यानं 3.5 षटकांत 14 धावा देऊन 3 बळी घेतले, तर चेतना विमुक्तीनं 4 षटकांत 16 धावा देऊन 3 बळी घेतले. याव्यतिरिक्त, सुगंधिका कुमारीनं 2 बळी घेतले. चेतना विमुक्तीला तिच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीर पुरस्कार मिळाला.

श्रीलंकेचा एकतर्फा विजय : युएईनं दिलेल्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना इमेशा दुलानी आणि चमारी अटापट्टू या जोडीनं श्रीलंकेला चांगली सुरुवात करुन दिली. श्रीलंकेच्या महिला संघानं इमेशा दुलानी आणि चमारी अटापट्टू यांच्या 5.5 षटकांत पहिल्या विकेटसाठी 57 धावांच्या भागीदारीनं दमदार सुरुवात केली. इमेशा दुलानी 18 चेंडूंमध्ये 5 चौकारांसह 25 धावा करुन धावबाद झाली. तर कर्णधार चमारी अटापट्टूनं 25 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांसह 48 धावा केल्या. संजना कविंदीनं 4 चेंडूंमध्ये 5 धावा केल्या. दोघीही शेवटपर्यंत नाबाद राहिल्या. संघानं 7.5 षटकांत एक गडी गमावून 80 धावा करत लक्ष्य पूर्ण केलं.

हेही वाचा :

  1. आशिया चषकात विजयी सुरुवात करण्यासाठी टीम इंडिया उतरणार मैदानात; विनामूल्य सामना 'इथं' पाहा लाईव्ह
  2. अर्जेंटिनानं तिसऱ्यांदा जिंकला हॉकी वर्ल्ड कप! नेदरलँड्सचं सलग चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
  3. आशियाई खेळ सुरु होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का; 'गोल्डन बॉय'ची स्पर्धेतून माघार, कारण काय?