ETV Bharat / sports

फलंदाजी करताना हर्ट अटॅक, LIVE सामन्यात क्रिकेटपटूचा मृत्यू; पाहा व्हिडिओ

एका साध्या मैत्रीपूर्ण सामन्यात जिथं जुने मित्र हसत-खेळत आणि उत्साहानं मैदानात उतरले होते त्यात एका फलंदाजाचा मृत्यू झाला.

Sri Lanka Cricketer Dies
LIVE सामन्यात क्रिकेटपटूचा मृत्यू (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : July 6, 2026 at 3:00 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

Sri Lanka Cricketer Dies : आपण अनेकदा मृत्यूविषयी बोलतो की मृत्यू कधीही येऊ शकतो, आणि ते खरं होतानाही आपण अनेकदा पाहतो. क्रिकेट, जो खेळ अनेकदा उत्कटता, मैत्री आणि उत्सवाचा मानला जातो, श्रीलंकेत हा खेळ एका क्षणात शोकात बदलला. एका साध्या मैत्रीपूर्ण सामन्यात जिथं जुने मित्र हसत-खेळत आणि उत्साहानं मैदानात उतरले होते, तो अचानक एका अशा शोकांतिकेत बदलला, ज्यानं संपूर्ण क्रिकेटविश्वाला धक्का बसला.

नेमकं काय घडलं : वास्तविक रविवारी श्रीलंकेतील बेरुआला इथं झालेल्या एका मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यादरम्यान एक खेळाडू मैदानात कोसळून मरण पावला. हा सामना एका 'ओल्ड बॉईज असोसिएशन'नं आयोजित केलेल्या क्रिकेट महोत्सवाचा भाग होता. स्थानिक वृत्तानुसार, मृत खेळाडूचं नाव झुल्फिकार असून तो 45 ते 46 वर्षांचा होता. तो बेरुआलाच्या चायना फोर्ट भागातील एका नामांकित शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमधील सामन्यात सहभागी झाला होता.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी त्याचा मृत्यू : प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, फलंदाजी करत असताना झुल्फिकार अचानक क्रीजवर कोसळला. सामन्याचं थेट प्रक्षेपण सुरु असताना, ही हृदयद्रावक घटना घडली तेव्हा तो तीन चेंडूंमध्ये सहा धावा करत असल्याचं दिसत होतं. 3.4 षटकांत धावसंख्या 37/5 होती आणि खेळ तात्काळ थांबवण्यात आला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तात्काळ त्याच्या मदतीसाठी धाव घेतली आणि त्याला बेरुआला प्रादेशिक रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयाच्या सूत्रांनुसार, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळं संपूर्ण वातावरण शोकसागरात बुडालं आहे. खेळाडू, आयोजक आणि प्रेक्षक सर्वजण धक्क्यात आहेत.

घटनेनंतर स्पर्धा रद्द : सुरुवातीला, झुल्फिकारला हृदयविकाराचा झटका आला असावा असा संशय आहे, तरी अधिकाऱ्यांनी अद्याप याची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. बेरुआला पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून ते वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहेत. दरम्यान, बेरुआलामध्ये त्याला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. लोक सोशल मीडियावर एका अशा खेळाडूच्या आठवणी शेअर करत आहेत, जो केवळ आपल्या जुन्या मित्रांसोबत खेळाचा आनंद घेण्यासाठी आला होता, पण कधीही घरी परतू शकला नाही.

हेही वाचा :

  1. W,W,W,W... लंकन गोलंदाजाचा अमेरिकेत कहर; चार चेंडूत 4 विकेट घेत संघाला मिळवून दिला विजय
  2. Wimbledon 2026: नोवाक जोकोविचनं तोडला रॉजर फेडररचा मोठा रेकॉर्ड; विक्रमी 17व्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
  3. सातव्यांदा वर्ल्ड कप जिंकताच ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस; भारतालाही मिळाले करोडो रुपये