दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकात सलग सातवा विजय; झिम्बाब्वेची विजयाची पाटी कोरी
दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकात सलग सातवा विजय; झिम्बाब्वेची विजयाची पाटी कोरी

Published : March 1, 2026 at 7:21 PM IST
नवी दिल्ली SA Beat ZIM : 2026 च्या टी-20 विश्वचषकातील प्रभावी कामगिरी सुरु ठेवत, दक्षिण आफ्रिकेनं त्यांच्या शेवटच्या सुपर-8 सामन्यात झिम्बाब्वेचा 5 विकेट्सनं पराभव केला. हा दक्षिण आफ्रिकेचा स्पर्धेतील सलग 7 वा विजय होता. दरम्यान, झिम्बाब्वे सुपर-8 मध्ये एकही विजय न मिळवता बाहेर पडला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 7 बाद 153 धावा केल्या, प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेनं 18व्या षटकात धावांचा पाठलाग करत विजय मिळवला.
South Africa extend their unbeaten run in the 2026 #T20WorldCup with a comfortable victory over Zimbabwe 👏
— ICC (@ICC) March 1, 2026
📝: https://t.co/TFO4Y1Unna pic.twitter.com/qfxXFYQhmA
सिकंदर रझाची शानदार खेळी : या सामन्यात कर्णधार सिकंदर रझाच्या 43 चेंडूत आक्रमक 73 धावा असूनही, दक्षिण आफ्रिकेनं अनुकूल फलंदाजीच्या परिस्थितीत झिम्बाब्वेला 7 बाद 153 धावांवर रोखलं. रझानं त्याच्या डावात आठ चौकार आणि चार षटकार मारले, परंतु दुसऱ्या टोकाकडून त्याला साथ मिळाली नाही. फक्त क्लाईव्ह मदंडे (नाबाद 26) 20 धावांचा टप्पा गाठू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून क्विन मफाकानं 4 षटकात 21 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. कॉर्बिन बॉशनंही दोन विकेट्स घेतल्या परंतु 40 धावा दिल्या. तर जॉर्ज लिंडे, लुंगी एनगिडी आणि अँरिच नोर्टजे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
Sikandar Raza signed off from the #T20WorldCup with a special all-round performance👏
— ICC (@ICC) March 1, 2026
He wins the @aramco POTM🏅
📝: https://t.co/TFO4Y1Unna pic.twitter.com/qFMVntX0Vx
आफ्रिकेकडून आरामात पाठलाग : दक्षिण आफ्रिकेनं हे लक्ष्य 17.5 षटकांत पूर्ण केलं. ज्यामध्ये डेवाल्ड ब्रेवीसनं 42 धावांची शानदार खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना, आफ्रिकन संघाची सुरुवात या सामन्यात चांगली झाली नाही, ज्यामध्ये त्यांनी 14 धावांवर 2 विकेट गमावल्या. त्यानंतर ब्रुईस आणि रिकेलटन यांनी डावाची सूत्रं हाती घेतली आणि संघाला विजयाकडे नेलं. या सामन्यात झिम्बाब्वेकडून त्यांचा कर्णधार सिकंदर रझा यांनी तीन तर ब्लेसिंग मुझारबानी आणि ब्रॅड इव्हान्स यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
हेही वाचा :

