ETV Bharat / sports

Women's T20 WC: आफ्रिकेनं थांबवला भारताचा विजयरथ; टीम इंडियाचा स्पर्धेत पहिला पराभव

चेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड इथं खेळल्या गेलेल्या महिला टी-20 विश्वचषक 2026 च्या 18व्या सामन्यात भारतीय संघाची अपराजित मालिका खंडित झाली.

Women's T20 WC
आफ्रिकेनं थांबवला भारताचा विजयरथ (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : June 21, 2026 at 11:40 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मँचेस्टर SAW Beat INDW : मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड इथं खेळल्या गेलेल्या महिला टी-20 विश्वचषक 2026 च्या 18व्या सामन्यात भारतीय संघाची अपराजित मालिका खंडित झाली. सलग दोन विजयांनंतर, भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाकडून स्पर्धेतील पहिल्या मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. भारतानं दिलेल्या 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेनं आपल्या मजबूत आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर हे लक्ष्य सहज गाठलं. विश्वचषकातील हा भारताचा पहिला पराभव असला तरी, दक्षिण आफ्रिकेनं स्पर्धेत आपला सलग दुसरा विजय नोंदवला.

नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी : या महत्त्वपूर्ण सामन्यात, आपला ऐतिहासिक 200 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच तिचा निर्णय चुकीचा ठरवला. दक्षिण आफ्रिकेच्या घातक आणि अचूक गोलंदाजीसमोर भारतीय आघाडीची फळी पूर्णपणे अपयशी ठरली.

सुरुवातीच्या धक्क्यांनंतर, भारतीय फलंदाजांनी सावधपणे खेळण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही फलंदाजानं मोठी किंवा शतकी खेळी केली नसली तरी, मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजांच्या छोट्या पण महत्त्वपूर्ण योगदानामुळं भारतीय संघानं एक सन्मानजनक धावसंख्या गाठली. भारतीय संघानं निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 158 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 159 धावांचं आव्हानात्मक लक्ष्य ठेवलं.

दक्षिण आफ्रिकेनं केसा लक्ष्याचा पाठलाग : 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघानं सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवलं. 25 धावांत 2 गडी गमावूनही, त्यांनी पुनरागमन केलं आणि 19.1 षटकांत 161 धावा करुन 6 गडी राखून सामना जिंकला. मागील सामन्यांमध्ये सातत्यानं प्रभावी कामगिरी करणारे भारतीय गोलंदाज या सामन्यात आफ्रिकन फलंदाजांना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी कोणत्याही मोठ्या दबावाशिवाय समजूतदारपणे आणि आक्रमकपणे फलंदाजी करत सहजपणे लक्ष्याचा पाठलाग केला, ज्यामुळं भारतीय संघाला विश्वचषकातील पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

हेही वाचा :

  1. कीवींनी इंग्रजांना 253 धावांनी हरवत जिंकली ओव्हल कसोटी; WTC गुणतालिकेत मोठा बदल
  2. 110 धावांची खेळी अन् दुसऱ्याच दिवशी टीममधून काढलं बाहेर; BCCI नं केली भारतीय संघाची घोषणा
  3. 120 चेंडूत 124 धावा काढण्यात अपयशी; सलग तिसऱ्या पराभवासह पाकिस्तान 8 दिवसांतच विश्वचषकातून बाहेर