ETV Bharat / sports

SL vs NZ Weather: 'करो या मरो' सामन्यात पाऊस 'व्हिलन' बनणार? कसं असेल हवामान, वाचा

2026 च्या टी-20 विश्वचषकातील सुपर-8 फेरीतील आजचा सामना महत्त्वाचा आहे.

SL vs NZ
'करो या मरो' सामन्यात पाऊस 'व्हिलन' बनणार? (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : February 25, 2026 at 12:45 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोलंबो SL vs NZ : 2026 च्या टी-20 विश्वचषकातील सुपर-8 फेरीतील आजचा सामना महत्त्वाचा आहे. कोलंबोमध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड क्रिकेट संघातील हा सामना दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्याची शेवटची संधी असू शकतो. या सामन्यात पराभूत संघ विश्वचषकातून जवळजवळ बोहर होऊ शकतो.

श्रीलंकेचा फलंदाजीत सुधारणा करण्याचा प्रयत्न : मागील सामन्यात श्रीलंकेला फलंदाजी करताना अडचणी आल्या. त्यांचे फलंदाज फिरकी गोलंदाजीसमोर मोठ्या धावा काढू शकले नाहीत. परिणामी, आजच्या सामन्यात फलंदाजांवर महत्त्वाची जबाबदारी असेल. पथुम निस्सांकासारखे खेळाडू चांगली सुरुवात करतील अशी अपेक्षा असेल. तसंच इतर फलंदाजांकडूनही संघाला अपेक्षा असेल.

न्यूझीलंडची सामना जिंकण्यावर नजर : दुसरीकडे, पावसामुळं न्यूझीलंड पहिल्या सामन्यात मैदानात उतरु शकला नाही. त्यामुळं, कीवी संघ या सामन्यात विजयासह त्यांची मोहीम मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. संघाकडे असे फलंदाज आहेत जे पॉवरप्लेमध्ये जलद धावा करु शकतात आणि संघाला चांगली सुरुवात मिळवून देऊ शकतात. शिवाय, त्यांच्याकडे असे फिरकीपटू आहेत जे सामन्याची परिस्थिती बदलू शकतात.

दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड :

  • एकूण टी-20 सामने - 28
  • न्यूझीलंडनं जिंकलेले सामने - 16
  • श्रीलंकेनं जिंकलेले सामने - 11
  • निकाल नाही - 1 सामना

सामन्यादरम्यान हवामान कसं असेल : श्रीलंका हवामान खात्यानं 25 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये खराब हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. कमाल तापमान 29 अंश आणि किमान तापमान 24 अंश असण्याची शक्यता आहे. मात्र, आजच्या सामन्यात पावसाची 10 टक्के शक्यता आहे. त्यामुळं, आजच्या सामन्यात पावसामुळं फारसा अडथळा येण्याची शक्यता कमी आहे.

खेळपट्टी कशी असेल : कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवरील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी खूप उपयुक्त मानली जाते. म्हणूनच फलंदाजांना सामन्याच्या सुरुवातीला इथं धावा काढण्यात फारशी अडचण येत नाही. मात्र, सामना जसजसा पुढं सरकतो तसतशी खेळपट्टी मंदावते, ज्यामुळं सामन्याच्या शेवटी फिरकी गोलंदाजांना अधिक मदत मिळते. त्यामुळं, दोन्ही संघ आज चांगले फिरकी गोलंदाज मैदानात उतरवू शकतात. या खेळपट्टीवर सर्वाधिक सांघिक धावसंख्या बांगलादेशनं (215/5 विरुद्ध श्रीलंका, 2018) केली होती.

सामना कसा पाहायचा : आजचा न्यूझीलंड आणि श्रीलंका क्रिकेट संघांमधील सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओहॉटस्टार अॅपवर देखील सामना लाईव्ह पाहू शकता.

हेही वाचा :

  1. नेट रन रेट सुधरवण्यासाठी टीम इंडियाला करावा लागणार चमत्कार; काय असेल समीकरण
  2. ठिकाणं निश्चित नाही, परंतु तिकिटांची विक्री सुरु; टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य आणि अंतिम सामन्याबद्दल आयसीसी कंफ्यूज
  3. पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर; कर्णधाराच्या शतकी खेळीनं इंग्लंड सेमीफायनलमध्ये